हिंगोली - डॉक्टरांवरील हल्ल्याचे प्रमाणात आजही कमी झालेले नाहीत. मात्र, त्या हल्ल्यांचा अजिबात विचार न करता डॉक्टर आपले कर्तव्य चोखपणे पार पाडतात. त्यामुळे डॉक्टर हा खरोखरच रुग्णांसाठी देवा प्रमाणेच आल्याचा अनुभव हिंगोलीत कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या एका शेतकऱ्याला आला आहे. या शेतकऱ्याने विष घेतले होते. मात्र, वेळेवर उपचार मिळाल्याने त्याचा जीव वाचला आहे.
डॉक्टने वाचवला शेतकऱ्याचा जीव; कर्जबाजारीपणाला कंटाळून घेतले होते विष - पावसाळा
हिंगोलीतील हाताळा गावातील एका ३० वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारी पणाला कंटाळऊन विष घेतले होते. वेळीच उपचार मिळाल्याने त्याचा जीव वाचला आहे.
उमेश प्रकाश काळे (वय ३० वर्षे) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. सेनगाव तालुक्यातील हाताळा येथे राहणाऱ्या उमेश काळेच्या वडिलांनी विविध बँकांचे, खासगी आणि सावकारी कर्ज घेतले आहे. ते कर्ज फेडायच्या चिंतेने २५ जून रोजी उमेशने घरीच विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. हा प्रकार लक्षात येताच घरच्यांनी त्याला गोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविले. तिथे डॉक्टरानी प्राथमिक उपचार करून त्याला जिल्हासामान्य रुग्णालयात पाठविले. मात्र, उमेशची प्रकृती गंभीर असल्याने, सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला नांदेड येथे जाण्यास सांगितले. रुग्णवाहिकेने नांदेडकडे निघाले ही होते. मात्र. प्रकृती गंभीर असल्याने नांदेड पर्यंत पोहोचणे शक्य नव्हते. त्यामुळे उमेशच्या नातेवाईकानी त्याला शहरातीलच एका खासगी रूग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर डॉ. श्रीराम राठोड, डॉ. भानुदास वामन, डॉ. रवी पाटील यांच्यासह त्यांच्या पथकाने प्रयत्नांची पराकाष्टा करून उपचार केले आणि त्याला वाचविण्यात यशही आले.
एवढेच नाही, तर शेतकऱ्याची घरची परिस्थिती अतीशय हलाकीची असल्याने, याच रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत लाभ दिला. यामुळे त्याचे सर्व उपचार योजनेअतर्गंत करण्यात आले. डॉक्टरांच्याच प्रयत्नामुळे आज मी जिवंत असून डॉक्टरांचे उपकार आयुष्य भर फेडू शकत नसल्याचे उमेशने सांगितले.