हिंगोली - सध्याच्या विदारक परिस्थितीमध्ये डॉक्टर हा देवदूत समजला जात आहेत. अनेक डॉक्टर जीव ओतून कामही करत आहेत. मात्र, हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रसूती कक्षात नियुक्ती केल्यानंतर इनचार्ज सिस्टरने फोन केला. मात्र, डॉक्टरने रुग्णावर उपचार करण्यास नकार देत 'मी राजीनामा देणार' असल्याचे फोनवरून सांगितले. डॉक्टरांच्या या आडमुठेपणामुळे रुग्णाला मात्र नांदेड येथे रेफर करण्याची वेळ आली. असे प्रकार नेहमीच घडत असल्याने, नातेवाईक वैतागून गेले आहेत. या ठिकाणी महिला रोगतज्ञ या कक्षामध्ये काम करण्यासाठी धजावत नसल्याचे विदारक चित्र आहे.
गोवकर्णा वैजनाथ गाडे (वय-24) या महिलेला सकाळी अचानक चक्कर आल्याने तिच्या नातेवाइकांनी तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयातील प्रसूती कक्षात नेहमीच डॉक्टरांचे राजकारण सुरू आहे. याचा नाहक फटका रुग्णांना सोसावा लागत आहे. आज (शनिवारी) असाच कठीण अनुभव या रुग्णाला आला. चक्क प्रसूती कक्षात रुजू केलेल्या डॉ. शिंदेंना फोन केला तर त्यानी इन्चार्जचे काहीही ऐकून न घेता स्पष्ट रुजू होण्यास नकार देत, मी राजीनामा देणार असल्याचे फोनवरून सांगितले. या भयंकर प्रकाराने इनचार्ज सिस्टर जोशी गोंधळून गेल्या. त्यानंतर महिला रुग्णाला नांदेडला रेफर केले. दरम्यान, महिलेची प्रकृती मोठ्या प्रमाणात खालावली होती. या प्रकरणी नातेवाईक देखील भांबावून गेले होते. मात्र, डॉक्टरच्या नकाराने रुग्णालयात चांगलाच गोंधळ उडाला.
प्रसूती कक्षात दाखल झालेल्या महिलेवर उपचार करण्यास डॉक्टरांचा स्पष्ट नकार
गोवकर्णा वैजनाथ गाडे(वय-24) या महिलेला सकाळी अचानक चक्कर आल्याने तिच्या नातेवाइकांनी तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयातील प्रसूती कक्षात नेहमीच डॉक्टरांचे राजकारण सुरू आहे. याचा नाहक फटका रुग्णांना सोसावा लागत आहे.
भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांना ही बाब समजताच त्यांनी तत्काळ शल्यचिकित्सक किशोर श्रीवास यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. गंभीर प्रकारची माहिती घेतली. मात्र, शल्यचिकित्सकाने मला काहीही माहिती नसल्याचे सांगितले. त्यामुळे अतिरिक्त शल्यचिकित्सक राहुल डोंगरे यांना संपर्क साधून, संबंधित डॉक्टरवर कारवाई करून, जिल्हाधिकाऱ्याकडे अहवाल पाठविण्याच्या सूचना दिल्या. तर वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार कारवाई करणार असल्याचे डोंगरे यांनी सांगितले. महिलेवर उपचार करण्यास नकार देणाऱ्या डॉ. शिंदेवर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी आणि आरोग्य विभाग काय करवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.