महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पहिल्यांदा चिक्कीसह मोबाईल घोटाळ्याची चौकशी करा - धनंजय मुंडे - समिती

महायुतीचा उमेदवार हा धुळ्याचा पार्सल आहे. ते धुळ्याचे पार्सल पुन्हा त्याच्या गावी पाठवावे, म्हणून मी हिंगोलीत आल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हणाले. तसेच जी तरुणाई मोदी मोदी म्हणून पेटून उठत होती त्या तरुणाईलादेखील रोजगार मिळाला का? असा सवालही त्यांनी केला.

हिंगोली सभेत बोलताना धनंजय मुंडे

By

Published : Apr 9, 2019, 12:07 AM IST

हिंगोली- आमची बहिण वारंवार आम्ही तोडपाणी करतो असे आरोप करते आणि वरून म्हणते की मी एका पैशाची शरमिंदी नाही. जर मी तोडपाणी करत असेल तर तुम्ही स्वतःहून आमच्या तोडपाणीची चौकशी करा. नाही तर तुम्ही केलेल्या चिक्कीची आणि मोबाईल घोटाळ्याची चौकशी समितीचा अध्यक्ष तरी आम्हाला करा, असा टोला धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंना लगावला.

हिंगोली सभेत बोलताना धनंजय मुंडे

हिंगोली येथे आघाडीचे उमेदवार सुभाष वानखेडे यांच्या प्रचारासाठी विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे आले होते. यावेळी ते बोलत होते.

यावेळी मुंडेंनी मोदी सरकराने ५ वर्षात तरुण, शेतकरी आणि सर्वसामान्यांची कशी फसवणूक केली याचा संपूर्ण हिशोब सांगितला. ते म्हणाले, हेच फसवेगिरी करणारे मोदी साहेब निवडणुकापूर्वी शरद पवारांवर टीका करतात तर निवडणूका संपल्यावर शरद पवारांचे बोट धरून राजकारण करायलाही तयार असतात. तसेच आजघडीला युती सरकारच्या काळात प्रत्येक बाबतीत महागाई वाढली आहे. १ एप्रिलला मोदी महाराष्ट्रात आले. त्यावेळी मोंदीनी विकासावर किंवा त्यांनी दिलेल्या आश्वासनावर बोलले नाही तर ते केवळ बोलले शरद पवार यांच्यावर आणि त्यांच्या घराबद्दल. तेव्हा 'मी जर तुम्हाला विचारले, की मोदी साहेब यशोदाबेनचे काय झाले तर कसे वाटेल' असा टोला त्यांनी मोदींना लगावला.

कधी नव्हे ती केवळ ५ वर्षात या युतीच्या सरकारने देशाची लोकशाही धोक्यात आणली. पुन्हा जर मोदी पंतप्रधान झाले तर परत निवडणूकच होणार नाही. काय जाणे पुन्हा एखाद्या रात्री नोटाबंदी सारखे 'भाई और बहिनो अब चुनाव ही बंद हो गये' असे होऊन बसेल. या सरकारने मराठा समाज, धनगर समाजाचीसुद्धा मोठ्या प्रमाणात फसवणूक केली आहे. मराठा आणि धनगर समाजाने प्रचंड संघर्ष केला. मात्र, त्यांच्या वाट्याला या सरकारने काही येऊ दिले नाही.

महायुतीचा उमेदवार हा धुळ्याचा पार्सल आहे. ते धुळ्याचे पार्सल पुन्हा त्याच्या गावी पाठवावे, म्हणून मी हिंगोलीत आल्याचे मुंडे म्हणाले. तसेच जी तरुणाई मोदी मोदी म्हणून पेटून उठत होती त्या तरुणाईलादेखील रोजगार मिळाला का? असा सवालही केला. या मोदीने देशातल्या प्रत्येक नागरिकांना २ लाखांनी लुटल्याचे मुंडे यांनी सांगितले.

उमेदवार सुभाष वानखेडे यांचे अर्धवट भाषण

सुभाष वानखेडेचे भाषण ऐकण्यासाठी ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात मतदार आले होते. वानखेडे यांचे भाषण सुरू करण्यासाठी जनता जोरजोरात ओरडून सांगत होती. दरम्यान, त्यांनी भाषण सुरू केले तोच धनंजय मुंडे यांचे हिंगोलीत आगमन झाले. यामुळे धनंजय मुंडे यांनाच भाषण करू देण्यात आले. त्यामुळे वानखेडे यांचे भाषण न झाल्याने अनेकांचा हिरमोड झाल्याचे पाहावयास मिळाले.

ABOUT THE AUTHOR

...view details