महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागनाथाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या पिकअपचा अपघात; उपचारासाठी सरकारी डॉक्टर नॉट रीचेबल - दर्शनासाठी जाणाऱ्या पिकअॅपचा अपघात

श्रावण महिना सुरू असल्याने हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे नागनाथाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून भाविक हजेरी लावत आहेत. आजही लोणार येथून पिकअॅप ने भाविक दर्शनासाठी येत होते. मात्र, वरुडचक्रपान येथे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला अन वाहन पुलावरून उतरून थेट झाडावर जाऊन आदळले. या वाहनातील 15 जण गंभीर जखमी झाले.

नागनाथाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या पिकअॅपचा अपघात

By

Published : Aug 18, 2019, 1:32 PM IST

हिंगोली - लोणारवरून औंढा नागनाथाच्या दिशेने देव दर्शनासाठी जाणाऱ्या पिकअपचा वरुडचक्रपान जवळ अपघात झाला. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने पिकअप पुलावरून खाली गेली, असा प्राथमीक अंदाज आहे. अपघातात १५ जखमी झाले आहेत. त्यांना प्राथमिक उपचारासाठी सेनगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, सरकारी डॉक्टर गायब असल्याने नागरिकांनी खासगी डॉक्टरांना विनंती करून जखमींवर उपचार केले. चार ते पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

नागनाथाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या पिकअॅपचा अपघात,उपचारासाठी सरकारी डॉक्टर नॉटरीचेबल

श्रावण महिना सुरू असल्याने हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे नागनाथाच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक हजेरी लावत आहेत. आजही लोणार येथून पिकअपने भाविक दर्शनासाठी येत होते. मात्र, वरुडचक्रपान येथे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला अन् वाहन पुलावरून उतरून थेट झाडावर जाऊन आदळले. या वाहनातील 15 जण गंभीर जखमी झाले. घटनास्थळी एकच आरडाओरड झाल्याने नागरिकांनी धाव घेऊन जखमींना बाहेर काढले. 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने सेनगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, रविवार असल्याने सर्वच सरकारी डॉक्टर नॉट रीचेबल होते. त्यामुळे नागरिकांनी एका खासगी डॉक्टरांना बोलावून जखमी रुग्णावर उपचार केले. गंभीर रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर केले. ग्रामीण रुग्णालयातील ही परिस्थिती पाहून जिल्हा उपप्रमुख संदेश देशमुख यांनी रुग्णालयाबाहेर तात्काळ आंदोलन सुरू केले. वास्तविक पाहता या तुघलकी कारभार संदर्भात देशमुख यांनी पंधरा दिवसांपूर्वीच आरोग्य विभागाला निवेदन दिले होते.

आरोग्य प्रशासनाने यावर कोणतीही दखल घेतली नाही, आज अपघातातील जखमी रुग्ण ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे आंदोलन सुरू केले आता आरोग्य प्रशासन नॉट रिचेबल असलेल्या डॉक्टरांवर काय कारवाई करते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. अपघातात योगेश इरतकर, सरिता इरतकर, अमोल सिरसाट, अंकिता इरतकर, अर्चना बाजाड, छायाबाई दळवे, पिया गवते सर्व लोणारचे रहिवाशी आहेत. हे गंभीर जखमी झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details