महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औषध फवारणीमुळे हिंगोलीत डेंग्यू नियंत्रणात - Hingoli latest news

संपूर्ण राज्यात डेंग्यूने थैमान घातले आहे. त्यामुळे शासकीय व खासगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्णांची गर्दी आहे. तर हिंगोलीत पावसाळा लागण्यापूर्वीच आरोग्य विभागाने दाखविलेली समयसूचकता डेंग्यूच्या आजाराची साथ कमी करण्यासाठी उपयोगी पडली आहे.

औषध फवारणीमुळे हिंगोलीत डेंग्यू नियंत्रणात

By

Published : Nov 21, 2019, 11:48 AM IST

हिंगोली- पावसाळा सुरू होण्यापूर्वीच जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेने जून महिन्यात 2 वेळा औषध फवारणी केल्यामुळे डेंग्यू सदृश्य परिस्थितीला आळा बसला आहे. जिल्ह्यात घेरलेल्या 109 रक्तजल नमुन्यांपैकी 4 डेंग्यू पॉजिटीव्ह आढळून आले आहेत. तर परिस्थिती नियंत्रणात असल्याचे कितीही सांगण्यात आले तरी, जिल्हासामान्य रुग्णालयात दोघांवर डेंग्यूचे उपचार केल्याची माहिती समोर आली आहे.

शिवाजी पवार, जिल्हा आरोग्यधिकारी

हेही वाचा - आयुक्तांसमोर रडणाऱ्या शेतकऱ्याला जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले ड्रामेबाज!

संपूर्ण राज्यात डेंग्यूने थैमान घातले आहे. त्यामुळे शासकीय व खासगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्णांची गर्दी आहे. तर हिंगोलीत पावसाळा लागण्यापूर्वीच आरोग्य विभागाने दाखविलेली समयसूचकता डेंग्यूचा आजाराची साथ कमी करण्यासाठी उपयोगी पडली आहे. डेंग्यू आजराबाबत राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत जिल्हा हिवताप कार्यालयाच्या वतीने पत्रकाद्वारेही जनजागृती करण्यात आली आहे. तसेच जानेवारी पासून आज पर्यंत 109 संशयित रुग्णांचे रक्तजल नमुने प्रयोगशाळेकडे पाठविले असता, त्यापैकी गिरगाव येथील तपीश नादरे (11), नचिकेत नादरे(6), गायत्री नादरे(7) आणि चाफनाथ येथील रजाक शेख पाशा(50) हे 4 रक्तजल नमुने डेंग्यू पॉजिटिव्ह आले आहेत.

हेही वाचा - पंचनामा झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळणारच - सुनील केंद्रेकर

तर 28 गावात धूर फवारणी करण्यात आली आहे. सोबतच जिल्हाभरात अँबेटिंग व किटकशास्त्रीय सर्वेक्षण केले आहे. त्यामुळे डेंग्यूच्या संख्येत घट घट झाली आहे. तसेच आरोग्य विभागामार्फत वेळेतच प्रतिबंधात्मक उपाय योजना केल्या जात आहेत. 5 धूर फवारणी यंत्र सज्ज ठेवण्यात आली आहेत. ज्या ग्रामपंचायतकडून धूर फवारणीची मागणी होते. त्या गावात धूर फवारणी केली जात आहे. मात्र, धूर फवारणी करून घेण्यासाठी ग्रामपंचायती सक्रियतेने सहभागी होत नसल्याचे चित्र आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details