हिंगोली- मित्रांसोबत बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या १० वर्षीय विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. जिल्ह्यातील महागाव येथे गुरुवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. कृष्णा संतोष जाधव, असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.
हिंगोलीत बंधाऱ्यात बुडून १० वर्षीय मुलाचा मृत्यू - drowned
कृष्णा गुरुवारी दुपारी शाळा सुटताच आपल्या मित्रासोबत गावापासून जवळच असलेल्या बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेला होता. त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला.
कृष्णा हा गावातीलच जिल्हा परिषद शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिक्षण घेत होता. त्याचे आई वडील रोजमजुरी करून कुटुंबाचा गाडा हाकतात. तो गुरुवारी दुपारी शाळा सुटताच आपल्या मित्रासोबत गावापासून जवळच असलेल्या बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेला होता. त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. त्याच्यासोबत असलेल्या मित्राने आरडाओरड केल्यानंतर जवळच काम करत असलेल्या शेतकऱ्यांनी बांधणाऱ्याकडे धाव घेतली. कृष्णाला पाण्याबाहेर काढून वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे महागावसह जिल्हाभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.