महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जवानाची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अस्पष्ट - हिंगोलीत जवानाची आत्महत्या

सुट्टीवर आलेल्या केंद्रीय राखीव दलातील जवानाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना हिंगोली जिल्ह्यात घडली आहे. आत्महत्येचे कारण कळलेले नाही. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

CRPF soldier commits suicide in Hingoli;
जवानाची गळफास घेऊन आत्महत्या

By

Published : May 3, 2021, 8:53 PM IST

हिंगोली - तालुक्यातील पिंपळखुटा येथे गळफास घेऊन एका जवानाने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी तीनच्या सुमारास घडली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

संजय योगाजी खंदारे (२८) रा. पिंपळखुटा ता. जि. हिंगोली असे मयत जवानाचे नाव आहे. जवान खंदारे हे केंद्रीय राखीव दलात चार वर्षापूर्वी रुजू झाले होते, तर ते सध्या जम्मू काश्मीर भागातील कुपवाडा येथे कर्तव्यावर होते. ते सात दिवसापासून महिन्याच्या सुट्टीवर आले होते. ते आज सकाळी शेतात गेले होते तेथेच त्यांनी जेवण केले. अन काही वेळाने शेतापासून जवळच असलेल्या शेतात जाऊन झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केलीय.

सद्या शेतीच्या कामाला गती आलेली आहे, अशातच घटनास्थळी असलेल्या विहीरीवर काही शेतकरी पिण्याचे पाणी भरण्यासाठी गेले असता त्यांच्या ही घटना लक्षात आली. त्यानी घटनेची माहिती गावात कळवली. ग्रामस्थांनी घटनास्थळी एकच धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मगन पवार, जमादार प्रवीण राठोड यांनी धाव घेऊन, घटनेचा पंचनामा केला. अन मृतदेह शेवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात हलविला. बासंबा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा - दिलासादायक! हिंगोली जिल्ह्यासाठी ११ हजार २०० कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध

ABOUT THE AUTHOR

...view details