महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगोलीत चोख बंदोबस्तात मतमोजणीला सुरूवात - grampanchayat nivadnuk 2021 maharashtra

हिंगोलीत 422 ग्रामपंचायतींच्या मतमोजणीला सुरूवात झालीय. मतमोजणीसाठी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

हिंगोलीत चोख बंदोबस्तात मतमोजणीला सुरूवात
हिंगोलीत चोख बंदोबस्तात मतमोजणीला सुरूवात

By

Published : Jan 18, 2021, 11:32 AM IST

हिंगोली - सर्वांचे लक्ष लागलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीसाठी सुरुवात झाली आहे. मतमोजणीच्या पहिल्या फेरीला सुरूवात झालीय. मतमोजणीसाठी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. मतमोजणी केंद्रांभोवती कार्यकर्ते उमेदवारांची गर्दी बघायला मिळत आहे. काही कार्यकर्त्यांनी तर मोठ्या आत्मविश्वासाने हार-तुरे देखील सोबत आणलेले आहेत.

हिंगोली जिल्ह्यात 422 ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया पार पडली. मतदानानंतर सर्वांनाच निकालाचे वेध लागले होते. त्यामुळे मतमोजणीच्या दिवशी पहाटेपासूनच मतमोजणी केंद्र परिसरात कार्यकर्ते दाखल झालेत. निवडणूक विभागाच्या वतीने तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणीची व्यवस्था केलेली आहे. त्या अनुषंगाने परिसरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.

हिंगोलीत तीन फेर्‍यांमध्ये होणार मतमोजणी
निवडणूक विभागाच्या वतीने मतमोजणीसाठी दोन दिवसापांसून जयत तयारी करण्यात आली होती. एकूण तीन फेऱ्यांमध्ये निवडणुकीची मतमोजणी होणार आहे.

हेही वाचा -राज्यातील १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल आज

ABOUT THE AUTHOR

...view details