हिंगोली -जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये दाखल झालेल्या दोन कोरोना संशयित रुग्णांपैकी एकाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे तर एकाचा अहवाल प्रलंबित असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. त्यामुळे हिंगोलीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
संपूर्ण देशात थैमान घातलेल्या कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची दिवसेंदिवस संख्या वाढत आहे. हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उभारण्यात आलेल्या आयसोलेशन वार्डमध्ये 30 मार्च रोजी दाखल झालेल्या कोरोना संशयिताचा निगेटिव्ह अहवाल औरंगाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाला आहे. तर 31 मार्च रोजी दाखल झालेल्या कोरोना संशयिताचा अहवाल हा औरंगाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालयाकडून येणे प्रलंबित आहे. त्या व्यक्तीची प्रकृती स्थिर असून, अजून तरी कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत.
'त्या' दोन कोरोना संशयितांपैकी एकाचा अहवाल निगेटिव्ह तर एकाचा प्रलंबित - hingoli hospital corona patient
संपूर्ण देशात थैमान घातलेल्या कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची दिवसेंदिवस संख्या वाढत आहे. हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उभारण्यात आलेल्या आयसोलेशन वार्डमध्ये 30 मार्च रोजी दाखल झालेल्या कोरोना संशयिताचा निगेटिव्ह अहवाल औरंगाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाला आहे.
'त्या' दोन कोरोना संशयितांपैकी एकाचा अहवाल निगेटिव्ह तर एकाचा प्रलंबित
संशयितांवर अनुभवी वैद्यकीय अधिकऱ्याच्या टीममार्फत उपचार सुरू आहेत. तर तिघांना घरातच वेगळ ठेवण्यात आले आहे. यामध्ये एक कझाकिस्तान, तर दोन मालदीवमधून हिंगोली येथे आले आहेत. हिंगोली जिल्हा रुग्णालयामार्फत तयार केलेल्या रॅपिड रेस्पॉन्स टिम आणि पोलीस प्रशासन यांच्यामार्फत दर दिवशी पाठपुरावा केला जात आहे.