हिंगोली - येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उभारण्यात आलेल्या आयसोलेशन वॉर्डमध्ये एक कोरोना संशयित रुग्ण दाखल करण्यात आला आहे. सदर व्यक्ती डॉक्टर असून अकोला येथील रुग्णालयात कार्यरत आहेत. त्यांना 24 मार्चपासून सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे आढळून आली आहेत.
कोरोना संशयित डॉक्टर हिंगोलीतील जिल्हा सामान्य रुग्णालयात निगराणीखाली - जिल्हा सामान्य रुग्णालय
संशयित डॉक्टरला आयसीएमआरच्या मार्गदर्शन सूचनेप्रमाणे हिंगोली येथील आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. रुग्णांचे वैद्यकीय नमुने पुणे येथील 'एनआयव्ही' संस्थेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
कोरोना संशयित डॉक्टर हिंगोलीतील जिल्हा सामान्य रुग्णालयात निगराणीखाली
संशयित डॉक्टरला आयसीएमआरच्या मार्गदर्शन सूचनेप्रमाणे हिंगोली येथील आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. रुग्णांचे वैद्यकीय नमुने पुणे येथील 'एनआयव्ही' संस्थेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
संशयित डॉक्टरच्या वैद्यकीय नमुन्यांचा अहवाल दोन दिवसांनी येणार आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. सध्या या रुग्णावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीममार्फत उपचार सुरू आहेत.