महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक! कोविड सेंटरला जाण्याकरता कोरोनाबाधिताला वापरावी लागली दुचाकी - कोरोनाबाधित दुचाकी प्रवास न्यूज

जिल्ह्यात रोज सरासरी ५० ते ६० रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णाच्या संख्येत वाढ होत असताना आरोग्य यंत्रणा कमी पडत असल्याचा अनुभव सेनगाव तालुक्यातील दाताडा येथील कोरोनाबाधित रुग्णाला आला आहे.

Corona patient using bike
दुचाकीवरून जात असताना कोरोनाबाधित रुग्ण

By

Published : Mar 17, 2021, 6:38 PM IST

हिंगोली- जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत प्रचंड वाढ होत चालली आहे. अशातच आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा समोर आला आहे. सेनगाव तालुक्यातील दाताडा येथील कोरोनाबाधित रुग्णाला वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. त्यामुळे रुग्णाला दुचाकीने कोविड सेंटरवर पोहोचावे लागले आहे.

जिल्ह्यात रोज सरासरी ५० ते ६० रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णाच्या संख्येत वाढ होत असताना आरोग्य यंत्रणा कमी पडत असल्याचा अनुभव सेनगाव तालुक्यातील दाताडा येथील कोरोनाबाधित रुग्णाला आला आहे. चाचणी झाल्यानंतर पथकाने रुग्णवाहिकेची व्यवस्था करून देण्याऐवजी त्याला कोविड सेंटरला जाण्याची सूचना दिली. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णाला दुचाकीवरून कोविड सेंटरला पोहोचवण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

हेही वाचा-नोकिया १० हजार कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढणार; 5 जी तंत्रज्ञानावर करणार लक्ष्य


सध्या जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात कोरोना चाचणी सुरू आहेत. प्रशासन चाचण्या करून घेण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. मात्र, चाचणीमध्ये रुग्ण कोरोनाबाधित आढळल्यानंतर आरोग्य यंत्रणेकडून खबरदारी घेण्यात येत नसल्याचे दिसून यते आहे.

रुग्णवाहिकांची संख्या अपुरी-
सध्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत चालली आहे. त्या तुलनेत चाचण्या वाढविल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नाईक यांनी सांगितले. ते म्हणाले की ग्रामीण रुग्णालयासाठी असलेल्या रुग्णवाहिकेचे काम निघाल्याने ही रुग्णवाहिका गॅरेजवर दुरुसाठी टाकली होती. मात्र, त्या कोरोनाबाधित रुग्णाला तोपर्यंत ग्रामीण रुग्णालयात थांबण्याची व्यवस्था केली जाणार होती. मात्र, त्या रुग्णाच्या नातेवाईकांनी अजिबात लक्ष दिले नसल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नाईक यांनी सांगितले.


हेही वाचा-आरबीआयने स्टेट बँकेला ठोठावला २ कोटींचा दंड

ऐनवेळी रुग्णवाहिका गॅरेजमध्ये!
सध्या कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह निघालेल्या रुग्णांना कोविड सेंटरमध्ये पोहोचवण्याची व्यवस्था आरोग्य यंत्रणेने करणे गरजेचे आहे. मात्र, रुग्णवाहिका गॅरेजमध्ये असतील तर कोरोना रुग्णांना त्रासाला सामोरे जावे लागणार असल्याचे स्पष्ट आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details