महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Coronavirus : हिंगोलीतील कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान नांदेडमध्ये मृत्यू - Corona virus

वसमत येथील ज्या खासगी रुग्णालयात या व्यक्तीवर उपचार करण्यात आले, त्या रूग्णालयाला सील करण्यात आले आहे. तसेच हा रुग्ण ज्या भागात वास्तव्यास होता, तो भाग देखील प्रशासनाकडून सील करण्यात आला आहे.

Hingoli Corona News
हिंगोली कोरोना बातमी

By

Published : Jun 11, 2020, 4:56 PM IST

हिंगोली- वसमत शहरातील खाटीक गल्लीतील एका व्यक्तीचा नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्याचा अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला बळी असून याची नोंद ही नांदेड प्रशासनाकडे करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम यांनी दिली.

वसमत शहरातील खाटीक गल्ली येथील रहिवासी असलेला व्यक्ती हा मागील 3 ते 4 दिवसांंपासून आजारी होता. त्यामुळे त्याला शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, त्याची प्रकृती अधिकच बिघडत असल्याने त्याला पुढील उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णलयात हलविले होते. मात्र, त्याठिकाणी उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला.

त्यामुळे वसमत येथील ज्या खासगी रुग्णालयात या व्यक्तीवर उपचार करण्यात आले, त्या रूग्णालयाला सील करण्यात आले आहे. हा रुग्ण ज्या भागात वास्तव्यास होता, तो भाग देखील प्रशासनाकडून सील करण्यात आला आहे. तर नगरपालिकेच्या वतीने या भागाची सॅनिटाइझरने फवारणी करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details