हिंगोली-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शेतकऱ्यांची कळकळची विनंती असून, त्यांनी शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी शेती मालाच्या वाहतुकीला परवानगी दिली असली तरी टरबूज आणि संत्र्यांना व्यापारी कवडीमोल भावाने खरेदी करत आहे. यातून आमचा तर सोडाच वाहतुकीचाही खर्च निघत नाही, अशी खंत हिंगोलीतल्या कुरुंदा वाई येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. या विदारक परिस्थितीमुळे शेतातील टरबूज आणि संत्रे फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे.
कोरोनाचा फटका; शेतकऱ्यांकडून 3 रुपये किलोने टरबूज खरेदी करताहेत व्यापारी! - कोरोना शेतकरी नुकसाना
टरबूज आणि संत्र्यांना व्यापारी कवडीमोल भावाने खरेदी करत आहे. यातून आमचा तर सोडाच वाहतुकीचाही खर्च निघत नाही, अशी खंत हिंगोलीतल्या कुरुंदा वाई येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
![कोरोनाचा फटका; शेतकऱ्यांकडून 3 रुपये किलोने टरबूज खरेदी करताहेत व्यापारी! corona effect](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6610148-984-6610148-1585656101150.jpg)
बळीराम प्रभाकर कदम असे शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडील 4 हेक्टर शेतीपैकी दोन एकर शेतीमध्ये त्यांनी सिमन्स बाहुबली जातीच्या टरबुजाची लागवड केली तर उर्वरित जमिनीत 250 झाडे संत्रा लावगड केली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने वाहतूकसेवा पूर्णपणे ठप्प केली आहे. त्यामुळे शेतीच्या मालाला कोणीही विचारायला अजिबात तयार नाही. मोठ्या आशेने सात वर्षांपासून संत्र्याची झाडे लावली होती, त्याला यावर्षी बऱ्यापैकी फळ लगडली होती. कोरोना आणि अवकाळी पाऊस या दुहेरी संकटामध्ये शेतकरी अडकला आहे.
पारंपरिक पिकाला बगल देत फळवर्गीय पिकाकडे वळण्याच्या निर्णयामुळे टरबुजाची लावगड केली होती. मात्र, टरबूज 2 ते 3 रुपये किलोप्रमाणे खरेदी केली जात आहे. टरबूज आणि संत्र्यावर एक ते दीड लाख रुपयांचा खर्च झाला असून निदान खर्च फिटून एखादा लाख तरी पदरात पडावे, अशी अपेक्षा शेतकरी कदम यांनी केले आहे.