हिंगोली -पैशाच्या वादातून राग अनावर झालेल्या ठेकेदाराने दोन मजुरांवर गोळीबार केल्याची घटना कनेरगाव नाका येथे घडली. यामध्ये मजूर गंभीर जखमी झाले आहेत. अनेक दिवसांपासून राज्य महामार्गाचे काम सुरू आहे. या रस्त्यावर परराज्यातील मजूर व ठेकेदार काम करतात. ठेकेदाराचा आणि पैशांची उचल घेतलेल्या मजुरांचा पैशावरून वाद झाला.
संजय कुमार आणि हरीराम निषाद (रा.प्यारेपुर, उत्तर प्रदेश) अशी जखमी मजुरांची नावे आहेत. हे दोघे अनेक दिवसांपासून रस्त्याचे काम करण्यासाठी आलेले आहेत. या दोघांनी ठेकेदाराकडून पैशाची उचल घेतली होती. काही तरी खासगी कामाचे कारण सांगून हे दोन मजूर गावी जाण्यासाठी सुट्टी मागत होते. मात्र, ठेकेदार त्यांना सुट्टी देत नव्हता. त्यामुळे जोरदार वाद झाला.