महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राजीव सातव यांच्यावर शासकीय इतमात अंत्यसंस्कार; १५ ते २० हजार लोकांची गर्दी - राजीव सातव यांच्यावर शासकीय इतमात अत्यसंस्कार

अंत्यविधीसाठी सातव यांच्यासोबत काम करणारे मंत्री उपस्थित होते. तर जिल्ह्यासह पर जिल्ह्यातूंन मोठ्या संख्येने कार्यकर्ते दाखल झाले होते. शासकीय इतमामात बंदुकीच्या तीन फैरी झाडून राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

congress-mp-rajeev-satav-funeral-
राजीव सातव यांच्यावर अत्यसंस्कार

By

Published : May 17, 2021, 1:53 PM IST

Updated : May 17, 2021, 3:49 PM IST

हिंगोली- कोरोनाशी झुंज देत अखेर 23 दिवसांनंतर काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे रविवारी सकाळी निधन झाले. त्यांच्यावर आज कळमनुरी येथे पंधरा ते वीस हजार जनसमुदायाच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार पार पडले. सातव यांचा मुलगा पुष्कराजने त्यांना मुखाग्नी दिला. सध्या कोरोना काळात अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र, सातव यांच्या अंत्यसंस्कारासाठी १५ ते २० हजार लोक जमले होते. परिणामी पोलीस प्रशासनाकडून कोरोना नियमांचे पालन करण्यासंदर्भात वारंवार सूचना दिल्या जात होत्या.

राजीव सातव यांच्यावर शासकीय इतमात अत्यसंस्कार
मोठ्या संख्येने कार्यकर्ते दाखल
अंत्यविधीसाठी सातव यांच्यासोबत काम करणारे मंत्री उपस्थित होते. तर जिल्ह्यासह पर जिल्ह्यातूंन मोठ्या संख्येने कार्यकर्ते दाखल झाले होते. तीन फायरिंग करून राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी नागरीकांनी मोठ्या संख्येने गर्दी झाली होती. तर पोलीस प्रशासनाच्यावतींने सामाजिक अंतर ठेवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात होते.
Last Updated : May 17, 2021, 3:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details