महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेने तिसऱ्या दिवशी घेतली हिंगोली जिल्ह्यात विश्रांती

काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली निघालेली भारत जोडो यात्रा हिंगोली जिल्ह्यांत दाखल झालेली (Bharat Jodo Yatra entered Hingoli districts) आहे. या यात्रेची काँग्रेसच्या वतीने तयारी पूर्ण झाली असून आज यात्रेचा विश्रांतीचा दिवस आहे.

Bharat Jodo Yatra
भारत जोडो यात्रा

By

Published : Nov 13, 2022, 7:04 PM IST

हिंगोली :कन्याकुमारी पासून निघालेली भारत जोडो यात्रा हिंगोली जिल्ह्यात तीन दिवसांपासून दाखल झाली आहे. आज महाराष्ट्रात पहिल्यांदाच भारत जोडो यात्रेने हिंगोली जिल्ह्यातील तिरुमला लॉन्स येथे विश्रांती घेतली (Bharat Jodo Yatra) आहे.

भारत जोडो यात्रेने घेतली तिसऱ्या दिवशी हिंगोली जिल्ह्यात विश्रांती

सात दिवसाचे नियोजन :या विश्रांतीमध्ये पुढील सात दिवसाचे नियोजन केले जाते. सोबतच यात्रेकरू विश्रांती सोबतच कोणाला काही वेदना झाल्या असतील, तर त्यावर डॉक्टर उपचार करून त्यांना औषधी गोळ्या देखील दिल्या जातात. तसेच सलग सहा दिवस चालल्यानंतर अंगावरील कपडे धुळीमुळे खराब होतात, ते धुण्याचे काम देखील आजच्या विश्रांतीच्या दिवशी केले जात असल्याचे यात्रेकरूंनी सांगितले.

यात्रेचा विश्रांतीचा दिवस :काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली निघालेली भारत जोडो यात्रा हिंगोली जिल्ह्यांत दाखल झालेली (Bharat Jodo Yatra entered Hingoli districts) आहे. या यात्रेची काँग्रेसच्या वतीने तयारी पूर्ण झाली असून आज यात्रेचा विश्रांतीचा दिवस आहे.

भारत जोडो यात्रा हिंगोली जिल्ह्यात :आजच्या दिवशी कपडे धुवून टाकणे, तसेच कुणाला काही आजार जाणवत असेल तर त्याची डॉक्टर तपासणी करतात. तसेच कुणाला पुस्तक वाचण्याचा छंद असेल तर पुस्तकाचे देखील वाचन करतात, विश्रांतीच्या ठिकाणी आयोजित केलेल्या मार्गदर्शन शिबिरात देखील अनेक यात्रेकरू सहभागी होतात. यात्रेची जबाबदारी टाकलेले देखील ती जबाबदारी पेलतात. यात्रा यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करत असल्याचे एका यात्रेकरूने (Rahul Gandhi Bharat Jodo Yatra) सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details