हिंगोली- पहिले शिवसेना, नंतर भाजप आणि आता काँग्रेसकडून सुभाष वानखेडे हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात दंड ठोकून उभे आहेत. मागील निवडणुकीत त्यांनी नामनिर्देशन पत्रात 5 लाख रुपयांची कार दाखविली होती. तर या लोकसभेत दाखल केलेल्या शपथपत्रात त्यांनी कार दाखवलेली नाही. त्यामुळे वानखेडे यांची कार कुणीकडे गेली, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. तर त्यांना निवडणुकीत कार विकावी लागल्याचीही खुमासदार चर्चा मतदार संघात रंगत आहे.
काँग्रेस उमेदवार सुभाष वानखेडेंची गेली कार कुणीकडे ? - Election
सुभाष वानखेडे यांनी मागील निवडणुकीत त्यांनी नामनिर्देशन पत्रात ५ लाख रुपयांची कार दाखविली होती. तर या लोकसभेत दाखल केलेल्या शपथपत्रात त्यांनी कार दाखवलेली नाही. त्यामुळे वानखेडे यांची कार कुणीकडे गेली, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
सुभाष वानखेडे यांचे दहावीचे शिक्षण 1985-86 मध्ये हदगाव येथील जिल्हापरिषद शाळेत झाले. त्यांच्याकडे एकूण 9 कोटी 16 लाख 78 हजार 663 रुपयांची मालमत्ता आहे. तर वानखेडे यांनी स्वतः संपादित केलेली स्थावर मालमत्ता 17 लाख 34 हजार तर त्यांना वारसा 24 लाख 78 हजार 480 रुपयांची संपत्ती प्राप्त झाली असून, वानखेडेंवर दोन बँकचे 75 लाख 59 हजार तर पत्नीच्या नावर 5 लाख रुपयाचे कर्ज आहे. विशेष म्हणजे सुभाष वानखेडे यांचे मागील लोकसभेपासून अजूनही डोंगरगाव येथे 62 हजार चौरस फुटात हॉटेल शिवाणीचे काम प्रगती पथावर सुरू असल्याचे दिसून येत आहे. तसेच विकास, बांधकाम, आदींच्या मार्गाने 20 लाख रुपयांची गुंतवणूक केली. तर वानखेडे यांच्या नावावर केवळ ४ हेक्टर ५४ आर एवढीच शेत जमीन आहे. शिवाय रिव्हॉल्व्हर ही आहे. मात्र या वर्षी नामनिर्देशन पत्र दाखल करताना सोबत जोडलेल्या शपथ पत्रातून कारच गायब झाल्याने वानखेडे यांनी कार विकिली की गायब झाली हेच कळायला मार्ग नाही.
मात्र सुभाष वानखेडे जसे बोलतात तसे तोलतातही काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्यानंतर नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी सभा झाली. यावेळी त्यांनी माझ्याकडे ना कोणती संस्था, शाळा नसल्याचे स्पष्ट केले आहे.