हिंगोली - उत्तर प्रदेशातील हाथरस येथील घटनेचा संपूर्ण देशभरात निषेध केला जातोय. पीडित मुलगी व तिच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी काँग्रेसने केली. हिंगोली येथील गांधी चौक येथे जिल्हा काँग्रेसच्यावतीने हाथरस प्रकरणी सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.
हाथरस प्रकरणी हिंगोलीत काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन
हिंगोली येथील गांधी चौक येथे जिल्हा काँग्रेसच्यावतीने हाथरस प्रकरणी सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. पीडित मुलगी व तिच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी काँग्रेसने केली.
उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील सामूहिक बलात्काराच्या प्रकरणावरून सध्या राजकीय वातावरण तापले आहे. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून, या घटनेने सर्व जण हादरून गेले आहेत. तर, पीडितेच्या नातेवाईकांना देखील अजिबात भेटू दिलं जात नाही. यातून सरकारला नेमकं काय साध्य करायचे आहे, असा सवाल काँग्रेसचे माजी आमदार डॉ. संतोष टारफे यांनी केला आहे.
पीडितेच्या भेटीसाठी गेलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांना तेथील पोलिसांनी धक्काबुक्की केली. ही लाजिरवाणी बाब असल्याचे संतोष टारफे म्हणाले. यावेळी जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे, विलास गोरे, जि.प.सदस्य डॉ सतिष पाचपुते, बुद्रुक पाटील, बंटी नांगरे, केशव नाईक, डॉक्टर भोसले, विशाल घुगे, यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.