हिंगोली- उत्तर प्रदेशातील पोलिसांकडून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीचा हिंगोलीमध्ये निषेध करण्यात आला आहे. औंढा नागनाथ येथे रास्ता रोको तर आखाडा बाळापूर येथे योगी आदित्यनाथ यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपाविरोधात घोषणाबाजी केली आहे.
उत्तर प्रदेशातील हाथरस येथील बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या नातेवाईकांची भेट घेण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी व प्रियांका गांधी हे जात होते. दरम्यान, उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांचे वाहन अडवले अन् पायी निघालेल्या राहुल गांधी यांना पोलिसांनी थेट धक्काबुक्की केली.
राहुल गांधींना झालेल्या धक्काबुक्कीच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्या पुतळ्याचे केले दहन - hingoli latest news
उत्तर प्रदेशातील पोलिसांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना केलेल्या धक्काबुक्कीच्या हिंगोलीमध्ये निषेध करण्यात आला आहे.
या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली असून, काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याच घटनेचा निषेध म्हणून आखाडा बाळापूर येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर योगी आदित्यनाथ यांच्या विरुद्ध घोषणाबाजी करून, त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी भाजपाविरोधात घोषणा दिल्या. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे व कार्यकर्त्यांनी हिंगोली-नांदेडवर रास्ता रोको केला.
हेही वाचा -राहुल गांधीं धक्काबुक्कीचे प्रकरणाचे हिंगोलीत पडसाद, काँग्रेसने केला निषेध