हिंगोली -शहरातील अंतुले नगर भागातील जिल्हा परिषद शाळेत एक पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापिकेत चक्क विद्यार्थ्यांसमोर झटापट झाली. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात शिक्षकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. तर शिक्षकाच्या दिशेने मुख्याध्यापिकेने चप्पल भिरकावून मारली एवढेच नव्हे तर काही वेळाने शिक्षिकेचा पती, मुलगा अन् त्याच्या मित्राने शिक्षकास जबर मारहाण केली. त्यामुळे शिक्षकाच्याही तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. या प्रकाराने मात्र शिक्षणक्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा -पुण्यात शिवसेनेची बंडखोरी; कसब्यातून शिवसेना नगरसेवक उतरणार रिंगणात
ज्ञानेश्वर लक्ष्मण ठाकरे असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. माझ्या सांगण्याप्रमाणे तू शाळा का चालवत नाहीस, असे मुख्याधिपिकेने शिक्षकाला विचारल्याने शिक्षकाने मुख्याध्यापिकेस अश्लीश भाषेत शिवीगाळ केली अन् विनयभंग करत चापटाने मारहाण करण्याची धमकी देखील दिली. त्यामुळे मुख्यध्यापिकेच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला आहे, असे तक्ररीत म्हटले आहे.