महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी खुशखबर..! महाविद्यालयातच मिळणार आता वाहन परवाना - vehicle license get in college

वाहन परवाना विद्यार्थ्यांना आता महाविद्यालयातच मिळणार आहे. महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना वाहन परवान्यासाठी परिवहन कार्यालयात खेटे मारण्याची गरज पडणार नाही. त्यांना महाविद्यालयात परवाना मिळणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली.

परिवहन मंत्री दिवाकर रावते

By

Published : Aug 14, 2019, 11:43 PM IST

Updated : Aug 14, 2019, 11:57 PM IST

हिंगोली - वाहन परवाना विद्यार्थ्यांना आता महाविद्यालयातच मिळणार आहे. महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना वाहन परवान्यासाठी परिवहन कार्यालयात खेटे मारण्याची गरज पडणार नाही. त्यांना महाविद्यालयात परवाना मिळणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली. हिंगोलीत परिवहन कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

आज हिंगोलीत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते लिंबाळा भागातील साडे पाच कोटी रुपये खर्चून बनविलेल्या परिवहन कार्यालयाचे उद्घाटन केले. उद्घाटन प्रसंगी रावते यांनी या इमारतीतून चांगल्यात-चांगली कामे होतील आणि सर्वसामान्यांची अजिबात हेळसांड होणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली. नेहमीच या भागात दलालांचा देखील सुळसुळाट होत असल्याची चर्चा जोरात सुरू असते. मात्र, आता तसे अजिबात होणार नाही. येथे येणाऱ्यांची कामे वेळेत कशी होतील, याकडे कटाक्षाने लक्ष दिले जाईल, एवढेच नव्हे तर कामे वेळेत पूर्ण करण्याचे देखील नियोजन असेल, असे रावते म्हणाले.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी खुशखबर..! महाविद्यालयातच मिळणार आता वाहन परवाना

पूर्वी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वाहनाचा परवाना काढण्यासाठी कार्यालयामध्ये खूपवेळा खेटे घालावे लागत होते. यामध्ये अनेकदा विद्यार्थ्यांचे शिक्षणही अधुरे राहत होते. याचा विद्यार्थ्यांना नाहक त्रास देखील सहन करावा लागत होता. मात्र, आता अजिबात विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, कारण ज्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा प्रवेश आहे. त्याच महाविद्यालयात त्या विद्यार्थ्यांचा वाहन परवाना देखील काढून देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. परिवहन कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी त्या महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांचे अर्ज घेत त्यांना वाहन परवाना देतील, अशी व्यवस्था भविष्यात केली जाईल.

तसेच महिलांसाठी वाहन भरती प्रक्रियाही केली जाणार आहे. पूर्वी सहायक परिवहन अधिकाऱ्यांसाठी अनुभव प्रमाण पत्र लागत होते ते मात्र आता रद्द केल्याचे मंत्री रावते यांनी सांगितले. सध्या रस्ते अपघातात दुचकीस्वारांचे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे दुचाकी स्वाराने हेल्मेटचा सर्वाधिक वापर करावा. आदिवासी महिलांना चालक म्हणून नेमले जाणार आहे. विशेष म्हणजे या कार्यालयात मनुष्यबळ देखील पुरविले जाईल. त्यामुळे कामाला आपसूकच वेग येईल, असे ते म्हणाले.

Last Updated : Aug 14, 2019, 11:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details