हिंगोली - कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातले असून प्रशासनदेखील अहोरात्र कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. प्रत्येक जिल्ह्यात कोरोनाची लागण झालेल्या रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने, भयभीत वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच स्वतःची काळजी देखील घेण्याच्या सूचना दिल्या.
मुख्यमंत्र्यांनी घेतला हिंगोली जिल्ह्याचा आढावा; आमदार बांगरांशी साधला दूरध्वनीवरून संवाद.. - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संतोष बांगर
राज्यात कोरोनाची लागण झालेल्या रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने, भयभीत वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच स्वतःची काळजी देखील घेण्याच्या सूचना दिल्या.
कोरोनासारख्या महाभयंकर लढ्यात प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करत आहे. विशेष म्हणजे प्रशासन अहोरात्र जीव ओतून काम करत असताना, अडचणीत सापडल्यांसाठी अनेक दानशूर पुढे येत, गरजवंतांपर्यंत अन्नधान्य पोहोचविण्याचा पर्यत्न करत आहेत. जसे शक्य होईल तसे या महाभयंकर संकटात मदत करत आहेत. अशाच परिस्थितीत जनतेसाठी धावून जाणाऱ्या आमदार संतोष बांगर यांना मुख्यमंत्र्यांनी फोनद्वारे जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच सर्वांनी विनाकारण घराबाहेर न पडता, विनाकारण गर्दी देखील न करण्याचे सांगितले.
एवढेच नव्हे तर, आमदार बांगर यांना नेहमीसारखा उत्साह न दाखवता स्वतःची काळजीदेखील घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यानी मोठ्या आपुलकीने दिल्या आहेत. यावरून मुख्यमंत्री ठाकरे यांना आपल्या महाराष्ट्रातील जनतेची काळजी असून कोरोनाला हरविण्यासाठी प्रशासन अथक परिश्रम घेत असल्याचे दिसून येत आहे.