हिंगोली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली येथे संचारबंदी दरम्यान पत्रकार आणि पोलीस अधिकाऱ्यात शाब्दिक चकमक झाली. शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यामध्ये पत्रकार यांच्या पाठीवर तर पोलीस अधिकारी यांच्या डोक्याला गंभीर मार लागला आहे. दोघांवरही हिंगोली येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कन्हैया खंडेलवाल पत्रकार, तर सहायक पोलीस निरीक्षक ओंमकांत चिंचोळकर असे जखमी अधिकाऱ्यांचे नाव आहे. हिंगोली शहरातील गांधी चौक येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तासाठी पोलीस तैनात होते. पत्रकार खंडेलवाल आणि सपोनि चिंचोळकर यांच्यात अचानक शाब्दिक वाद झाला. हा वाद एवढा वाढला की, शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. हाणामारीचे नेमके कारण काय? हे अद्याप तरी कळू शकले नाही.