महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक! अनैतिक संबंधास अडसर ठरणाऱ्या ६ वर्षीय चिमुकल्याचा खून - खून

गजानन पंडित शिंदे (वय ६) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. ही घटना रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

मृत गजानन

By

Published : Mar 21, 2019, 1:29 PM IST


हिंगोली- अनैतिक संबंधास अडसर ठरणाऱ्या ६ वर्षीय चिमुकल्याचा गळा आवळून खून केल्याची घटना जिल्ह्यातील कहाकर येथे घडली आहे. गजानन पंडित शिंदे (वय ६) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. ही घटना रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे कहाकर येथे होळी साजरी करण्यात आली नाही.

काशीराम आत्माराम काळे, असे आरोपीचे नाव आहे. आरोपीचे मृताच्या आईसोबत अनेक दिवसांपासून अनैतिक संबंध होते. त्या संबंधास मृत चिमुकला अडथळा ठरत असल्याने आरोपीने चिमुकल्याचा सुतळीने गळा आवळून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने मृतदेह गावापासूनच काही अंतरावर असलेल्या सिनगी खांबा परिसरातील झुडपात फेकुन दिला.

या प्रकरणी महदा आयाजी डोखळे यांच्या फिर्यादीवरून सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आरोपी या चिमुकल्यावर टपून होता, त्याने यापूर्वी देखील चिमुकल्याला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे, नागरिकांनी सांगितले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास सेनगाव पोलीस करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details