महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगोली : बैलांची चोरी करणारे रॅकेट गजाआड, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

जिल्ह्यातील बैल चोरी होण्याच्या घटनांमागील सुत्रधार अखेर पोलिसांच्या हाती लागले आहेत. सर्वाधिक जास्त कळमनुरी अन् बाळापूर परिसरात चोऱ्यांच्या घटनात वाढ झाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने विशेष पथक नेमून, आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली. गुप्त माहिती अन् सायबर सेलच्या साह्याने नांदेड येथून काही जणांना ताब्यात घेतले. विचार विचारपूस केली असता, त्यांनी अनेक घटनांची कबुली दिली.

 बैलांची चोरी करणारे मोठे रॅकेट पकडले
बैलांची चोरी करणारे मोठे रॅकेट पकडले

By

Published : Aug 11, 2020, 8:03 PM IST

हिंगोली - शेतातील व गोठ्यातील बैलांची चोरी होत असल्याने पशुपालक चांगलेच त्रासले होते. हा प्रकार गेल्या दहा महिन्यापासून सुरू होता. बैल चोरीच्या वाढत्या घटनांमुळे शेतकरी चिंतातूर झाले होते. सर्वाधिक जास्त कळमनुरी अन् बाळापूर परिसरात चोऱ्यांच्या घटनात वाढ झाली होती. या प्रकरणी गुन्हेही दाखल झाले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने विशेष पथक नेमून, घटनास्थळी भेट दिली अन् आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली. गुप्त माहिती अन् सायबर सेलच्या साह्याने नांदेड येथून काही जणांना ताब्यात घेतले. विचार विचारपूस केली असता, त्यांनी अनेक घटनांची कबुली दिली.

स. इब्राहिम उर्फ बाबा पी स. सरवर, महोमद फिरोज उर्फ पिरू महोमद गोस, शेख शमी शेख मतींन, मोहम्मद रियाज अब्दुल रोफ, सोहेल खान उर्फ सोनू यावर खा पठाण, शेख शफी उर्फ बिल्डर, शेख इम्रान शेख अहेमद, अब्दुल अमर अब्दुल शुबुर, शेख अमेर उर्फ अम्मू, शोयाब उर्फ मामु, मोहमद जावेद मो इक्बाल, अब्दुल जुबेर अब्दुल अस्मान सर्व रा.नांदेड अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांना विश्वासात घेऊन, विचारपूस केली असता, त्यानी हिंगोली, परभरणी, नांदेड जिल्ह्यात बैलचोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून या गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी, एक टाटा कंपनीचा दहाचाकी ट्रक जप्त केला आहे.

सदर आरोपींनी चोरी केलेले गाय, बैल हे शेख शफी बिल्डर, तसेच शेख इम्रान शेख अहेमद याच्या ओळखीचे बैल कापणाऱ्या कुरेशी याला विक्री केल्याचे सांगितले. आरोपिकडून बैलांची कत्तल करणाऱ्यांची नावे विचारली. तर मोहम्मद फयजान मोहम्मद इब्राहिम कुरेशी, रा. हैदराबाद, मोहम्मद फेरोज मोहम्मद हुसेन कुरेशी, महोम्मद अहेमद महोमद हुसेन कुरेशी, महोमद नसीम महोमद सालर कुरेशी, अब्बास वहाब कुरेशी, महोमद अन्सार महोमद बाबू कुरेशी रा. हयातनगर ता. वसमत यांची नावे पुढे आहे. पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून विचारपूस केली असता शफी बिल्डर व त्याच्या इतर सहकाऱ्यांकडून ट्रकमध्ये आणलेले गाय, गोरे, बैल अर्ध्या किमतीत विकत घेऊन त्याची कत्तल करून नांदेड येथील विविध भागात मांस पोहोचविल्याची धक्कादायक माहिती त्यांनी दिली.

आरोपीने सांगितलेल्या घटनेने पोलीस चांगलेच अवाक् झाले. तर आखाडा बाळापूर येथील पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात वापरलेला टाटा कंपनीचा दहाचाकी ट्रक, एक दुचाकी, मोबाईल आणि नगदी रुपये, तर कळमनुरी, बासंबा, ओंढा नागनाथ आशा वेगवेगळ्या सहा गुन्ह्यातील 20 लाख 66 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनी शिवसांब घेवारे, किशोर पोटे यांच्यासह आदींनी केली. बैल चोरी करणारी मोठी टोळी हाती लागल्याने यांच्याकडून अजूनही मोठ्या घटना उघडकीस होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details