हिंगोली- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होईल अशा सर्व कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्यातील मुंबई येथे कार्यरत असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने गावी येऊन गर्दी जमवत नवसाचा कार्यक्रम केला. या प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध ग्रामसेवकाच्या फिर्यादीवरुन ओंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसाला नवसाचा कार्यक्रम भोवला.. गर्दी जमवल्याने गुन्हा दाखल
लिंग पिंपरी गावचा व्यक्ती मुंबई पोलिसात कार्यरत आहे. तो 22 जूनला लिंग पिंपरी येथे आले. गावात आल्यावर कोत्याही प्रकारची चाचणी न करता 28 जूनला नवसाचा कार्यक्रम ठेवला. या कार्यक्रमासाठी गावातील 60 ते 70 ग्रामस्थाना निमंत्रण दिले.
लिंग पिंपरी गावचा व्यक्ती मुंबई पोलिसात कार्यरत आहे. तो 22 जूनला लिंग पिंपरी येथे आले. गावात आल्यावर कोत्याही प्रकारची चाचणी न करता 28 जूनला नवसाचा कार्यक्रम ठेवला. या कार्यक्रमासाठी गावातील 60 ते 70 ग्रामस्थाना निमंत्रण दिले. कार्यक्रम पार पडला. त्यानंतर या पोलिसाच्या कुटुंबातील सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
आरोग्य विभागाकडून आता त्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या नागरिकांचा शोध घेतला जात आहे. तर पोलिसाविरुद्ध औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात ग्रामसेवक ज्ञानेश्वर झुंगरे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला आहे. पोलिसाने केलेल्या नवसाची आणि त्यासाठी कार्यक्रम ठेवून जमवलेल्या गर्दीची चर्चा आता जोर धरत आहे.