हिंगोली -ठाणे जिल्ह्यातील 'मातृभूमी रिअलटेक डेव्हलपमेंट कंपनी' हिंगोलीतील ठेवीदारांना व विमा ग्राहकांना मुदत संपलेली असताना देखील रक्कम देण्यासाठी टाळाटाळ करत आहे. त्यामुळे संतापलेल्या ग्राहकांनी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात कंपनीच्या पाच संचालकाविरुद्ध 19 लाख रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
हिंगोलीतील कार्यालयच केले बंद -
प्रदीप गर्ग (रा. शांती गार्डन सेक्टर, मीरा रोड पूर्व, ठाणे), संजय हेमंत बिश्वास (रा. हॅपी होम पूनम सागर, कॉम्प्लेक्स मीरा रोड, ठाणे), मिलिंद अनंत जाधव (रा. साकेत अपार्टमेंट, पचपाखाडी, ठाणे), निशांत उर्फ मोनू गुप्ता (रा. ठाणे), विनोद पटेल (रा. नानापोंडा लुहार, जि. बलसाड गुजरात) अशी संचालक मंडळाची नावे आहेत. या सर्वांनी गुंतवणूक व ग्राहक वाढवण्यासाठी सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह, सेल्स ऑफिसर, डेव्हलपमेंट ऑफिसर अशी पदे दिलेली आहेत. कंपनीच्या नियमानुसार या सर्व कर्मचाऱ्यांनी कंपनीसाठी गुंतवणूक व विमा ग्राहक वाढवले. कर्मचाऱ्यांनी सांगितलेल्या नियमानुसार तक्रारदारांनी ठेवी ठेवल्या. मात्र, 2017 नंतर विमा कंपनीने विमा रक्कम व ठेवीची रक्कम देण्यासाठी टाळाटाळ केली. हा संपूर्ण प्रकार लक्षात आल्यानंतर तक्रारदारांनी संचालकाशी संपर्क साधला. संचालक मंडळाने लवकरच रक्कम परत देण्याचे आश्वासन दिले. मात्र, कंपनीने हिंगोली येथील कार्यालयात बंद करून टाकल्याने सर्व ठेवीदारांमध्ये एकच गोंधळ उडाला.
ठेवीदारांनी गाठले पोलीस ठाणे -