हिंगोली - ओंढा परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सिद्धेश्वर वनपरिमंडळ मधील नियतक्षेत्र ढेगज दूरचुना शिवारात वन विभागाच्या दुर्लक्षित पणाचा फायदा घेत वन्य प्राण्यांची शिकार करून त्यांचे मांस विक्री होते, अशी बातमी 'ईटीव्ही भारत' ने प्रकाशित केली होती. या बातमीची दखल घेत ओंढा वन विभागाने तपासाची चक्रे फिरवून, शिकार करणाऱ्यांवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ६ आरोपींना ताब्यात घेतले आहे. वन विभागाच्या या कारवाईने मात्र जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडालीय.
ईटीव्ही भारत इम्पॅक्ट : वन्यप्राण्यांचे मांस खाणे गावकऱ्यांच्या अंगलट; गुन्हा दाखल - सिद्धेश्वर
ओंढा परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सिद्धेश्वर वनपरिमंडळ मधील नियतक्षेत्र ढेगज दूरचुना शिवारात वन विभागाच्या दुर्लक्षित पणाचा फायदा घेत वन्य प्राण्यांची शिकार करून त्यांचे मांस विक्री होते, अशी बातमी 'ईटीव्ही भारत' ने प्रकाशित केली होती. या बातमीची दखल घेत शिकार करणाऱ्या ६ जणांना ताब्यात घेतले आहे.
राजाराम चिंतामणी गायकवाड, सुनील देवराव धनवे (दोघे रा. दुरचुना), विठ्ठल दामला आडे, उत्तम पुरा चव्हाण, परमेश्वर प्रल्हाद चव्हाण, राहुल विश्वनाथ आडे (सर्व रा. वडचूना) असे आरोपीची नावे आहेत. आरोपीने दुरचुना परिसरातील राखीव वन कॅम्प क्र. ६३७ गट क्रमांक २२ मध्ये एका रानडुकराची शिकार करून दिनकर केशव चव्हाण यांच्या मालकीच्या शेतात त्या रानडुकराचे खाण्याच्या उद्देशाने हिस्से करण्यात आले होते. या घटनेची बातमी 'ईटीव्ही भारत' ने प्रकाशित केली होती. याची वन विभागाने याची दखल घेत तपासाची चक्रे गतीने फिरविली. ताबडतोब वडचूणा अन दुरचुना येथे धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले. जरी या घटनेत आरोपी उघड झालेले असले तरी अजूनही जिल्ह्यातील विविध वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्यांच्या शिकारी होतात. याकडे ही वनविभागाने लक्ष देण्याची नितांत गरज आहे. मात्र, आज केलेल्या कारवाईमुळे वन्यप्राण्याच्या शिकारी करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.