महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कारने चार पलट्या घेऊनही जीव वाचला; हिंगोलीत मोटारीचा भीषण अपघात - Hingoli Car Accident latest news

हिंगोलीमध्ये आज सकाळी मोटारीचा भीषण अपघात झाला. मात्र, सुदैवाने मोटारीतील चालक विठ्ठल चोतमल यांना कोणतीही इजा झाली नाही. हिंगोलीमध्ये काही दिवसांपूर्वी दोन भीषण अपघात झाले होते.

हिंगोली अपघात न्यूज
हिंगोली अपघात न्यूज

By

Published : Nov 20, 2020, 3:41 PM IST

हिंगोली - जिल्ह्यात अपघाताची मालिका सुरूच आहे. आज सकाळी मोटारीचा भीषण अपघात झाला असून मोटारीतील विठ्ठल चोतमल हे थोडक्यात बचावले आहेत.

जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल चोतमल हे नांदेड मार्गे किन्होळा गावी एकटेच निघाले होते. तेव्हा अचानक मोटारीचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला. पलट्या खात गाडी रस्त्यापासून पाच ते सात फूट अंतरावर हळदीच्या शेतात जाऊन पडली. मात्र, सुदैवाने चोतमल यांना कोणतीही इजा झाली नाही.

यापूर्वीचे अपघात -

हिंगोलीमध्ये काही दिवसांपूर्वी दोन भीषण अपघात झाले होते. शहरापासून काही अंतरावर असलेल्या बळसोंड भागातील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ जेसीबी वाहून नेणाऱ्या कंटेनर खाली येऊन पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला होता. तर 10 नोव्हेंबरला हरभऱ्याची पेरणी करत असताना ट्रॅक्टर विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. सचिन मिराशे असे या तरुणाचे नाव होते. तो सेनगाव तालुक्यातल्या कसबे धावंडा येथील रहिवासी होता. पेरणी करत असताना ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details