हिंगोली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेले जिम आज तब्बल आठ महिन्यानंतर उघडण्याची परवानगी सरकारने दिली आहे. त्यामुळे सरकारचे जिम चालकानी आभार मानत नियमाचे अजिबात उल्लंघन न करता नियमित जिममध्ये येणार असल्याचे अनेक युवकांनी सांगितले.
जिम उघडण्याची परवानगी दिल्याने व्यावसायिकाने सरकारचे मानले आभार
नियमित जिममध्ये गेल्यामुळे शरीर तर सुदृढ तर राहतेच, वरून आरोग्य देखील ठणठणीत राहते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिम बंद केल्याने समस्या निर्माण होत होती. आता जिम सुरू करण्याची परवानगी दिल्याने, आता आम्ही आमचे आरोग्य तर ठणठणीत ठेऊच वरून नियमाचे देखील पालन करणार, कदाचित सरकारला आमची दया अली असावी, उशिरा का होईना, हा निर्णय आमच्या आरोग्याच्या दृष्टीने फार महत्वाचा असल्याचे, कोच योगी सारगो यांनी सांगितले.
जिम उघडण्याची परवानगी दिल्याने व्यावसायिकाने सरकारचे मानले आभार
सध्या तरुणाईला फिटनेसचे फार आकर्षण आहे. त्यामुळे बऱ्याच युवकाची ओढ ही जिमकडे आहे. हेच आकर्षण ओळखून हिंगोली जिल्ह्यात चार ते पाच ठिकाणी भव्य जिम उभारण्यात आले आहेत. जवळ पास 100 ते 150 युवक, व्यक्ती नियमित येतात. आता याचा उपयोग हा शरीरासाठी होणार आहे.
Last Updated : Oct 26, 2020, 4:21 PM IST