हिंगोली -रस्त्यावरून अतिशय विदारक परिस्थितीमध्ये घेऊन जाणाऱ्या गुरांना पोलीस, पशुप्रेमी जीवाची बाजी लावून पकडून त्यांचे संरक्षण व्हावे म्हणून गोशाळेत सोडतात. अशाच स्थितीत सेनगाव तालुक्यातील हत्ता नाईक तांडा येथील गोशाळेत पोलिसांनी पकडलेले 18 बैल सोडले असता, त्यातील 3 लाख 60 हजार रुपये किमतीचे 16 बैल गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात फरार गोशाळा चालकाविरुद्ध बबन गोवर्धन राठोड यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे.
ओंढा नागनाथ पोलिसांनी 28 जुलैला कत्तलखान्याकडे जाणारे 18 बैल एका ट्रकमधून पकडले होते. नंतर ते बैल सेनगाव तालुक्यातील हत्ता नाईक तांडा येथील गोशाळेत ठेवले होते. हे प्रकरण न्यायालयात सुरू असताना, 14 ऑगस्टला ओंढा नागनाथ येथील न्यायालयाने बैल मालकास परत देण्याचा आदेश पारित केला होता. त्यानुसार बैल मालक शेख शफी शेख मदार कुरेशी हे बैलांचा ताबा घेण्यासाठी आदेश घेऊन हत्ता नाईक तांडा येथे धाव घेऊन, गोशाळा गाठली. मात्र, तेथे 18 पैकी 2 च बैल दिसून आले. उर्वरित बैलांची विचारणा केली. मात्र उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती. बैल गायब झाल्याने एकच खळबळ उडाली.
कुंपणानेच खाल्ले शेत; हिंगोलीतील गोशाळेतून बैल गायब - hingoli goshala news
न्यायालयाच्या आदेशाला न मानणाऱ्या गोशाळा पालकांकडे बैल मालकाने बैलांची विचारपूस करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने फोन बंद करून ठेवल्याने, काही ही संपर्क होऊ शकला नाही. गोशाळा चालक शिवाजी गडदे हे बैल देण्यास का टाळाटाळ करत असावा, तसेच, 16 बैल नेमके ठेवले कुठे, बैल सुरक्षित आहेत का? आदी प्रश्न निर्माण होत आहेत.
न्यायालयाच्या आदेशाला न मानणाऱ्या गोशाळा पालकांकडे बैल मालकाने बैलांची विचारपूस करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने फोन बंद करून ठेवल्याने, काहीही संपर्क होऊ शकला नाही. गोशाळा चालक शिवाजी गडदे हे बैल देण्यास का टाळाटाळ करत असावे. तसेच, 16 बैल नेमके ठेवले कुठे, बैल सुरक्षित आहेत का? आदी प्रश्न निर्माण होत आहेत. यापूर्वी देखील हिंगोली न्यायालयाने असेच बैल मालकाला बैल देण्याचे आदेश दिले होते. मात्र, तो देखील आदेश पाळला नव्हता. शिवाय, ज्या गोशाळेत गायी बैल बांधले जातात, तेथील कधी शेण काढले जात नाही.
त्यांना चारा पाणी देखील वेळेवर दिले जात नसल्याने, गुरे येथे शेवटची घटका मोजत आहेत. याच निर्दयी गोशाळा चालकांची गोवंशीय जनावरांचे पालन- पोषण करण्यासाठीच्या कार्यक्रमात निवड झालेली आहे. या कार्यक्रमाअंतर्गत शाळेला सुमारे 1 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. त्यातील 65 ते 70 लाख रुपयांचे अनुदान हे गोशाळेत प्राप्त झाले आहे. तरी देखील येथील गुरांची ही विदारक स्थिती आहे. आता मात्र गोशाळा चालकाला ताब्यात घेतल्यानंतर धक्कादायक प्रकार उघडकीस होणार आहे. तर दुसरीकडे मात्र गोशाळा चालकांचे नातेवाईक पोलिसांकडे बोट दाखवत आहेत. हा सर्व प्रकार पोलीस स्वतःहून घडवत असल्याचा आरोप ते करत आहेत. आरोपी गोशाळा चालक शिवाजी गडदे याला ताब्यात घेतल्यानंतर नेमका खरा काय प्रकार आहे.