हिंगोली -कामगार कार्यालयाकडून कामगारांसाठी साहित्य पुरवण्याची महत्वकांक्षी योजना राबविली जात आहे. मात्र, दलाल कार्यालयातील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून पेट्या मिळवून देण्यासाठी हजारो रुपयांची लूट करत आहेत. औद्योगिक वसाहतीत पहाटे चार वाजल्यापासून कामगार पेट्या घेण्यासाठी रांगा लावत आहेत.
कामगार साहित्य वाटपात दलालांचा सुळसुळाट हेही वाचा-...तर मोदींची जागा संसदेत नाही तर प्राणिसंग्रहालयात हवी
जिल्ह्यातील कामगारांना जिल्हा कामगार कार्यालयाकडून चार ते पाच महिन्यापासून कामगार साहित्य वाटप करण्याचे काम सुरू आहे. हे वाटप जरी टप्प्याटप्प्याने होत असले तरी यामध्ये दलाल घुसले आहेत. ते मजुरांकडून पाचशे ते हजार रुपये केवळ कागदपत्रे नोंदणी करून घेण्यासाठी, नंतर पेटी मिळवून देण्यासाठी घेत आहेत. खर तर संबंधित कंपनीला 15 ऑगस्ट पर्यंत साहित्य वाटपाची मुदत देण्यात आली होती. मात्र, पुन्हा कामगारांची संख्या वाढल्याने वाटपास सुरुवात झाली.
नोंदणी झालेल्या कामगारांना तारीखेनुसार वाटप सुरू आहे. आपल्याला साहित्य मिळावे म्हणून कामगार पर्वा न करता पहाटे परिसरात धाव घेत आहेत. काही कामगार तर आपल्या नातेवाईकाकडे मुक्काम ठोकत आहेत. मात्र, दलाला मार्फत पेट्या वाटप होत असल्याने, ताटकळत बसलेल्या कामगाराना रिकाम्या हाताने परतण्याची वेळ येत आहे. त्यामुळे अनेक कामगार अडचणीचा सामना करत आहेत.