हिंगोली -कोरोनामुळे प्रत्येक जण अस्वस्थ आहेत. त्यामुळे प्रशासनकडूनही विविध नियमे लागू करण्यात येत आहे. तर मुख्यमंत्र्यांकडूनही जनतेला वारंवार आवाहन केल्या जात आहे. मात्र आज (सोमवारी) हिंगोली जिल्हा दोऱ्यावर आलेले राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या कार्यक्रमाने कोरोना आहे की गेला याचाच प्रत्यय पहायला मिळाले. हिंगोली येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी क्रेनद्वारे हार बनवून पाटील यांच्या स्वागताची तयारी केली होती. मात्र पाटील यांनी ते स्वागत नाकारल्याने कार्यकर्त्यांचा काहीसा भ्रमनिराश झाला. मात्र यावेळी उसळलेली गर्दी कोरोना आमंत्रण देणारी ठरणार असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात कोरोना नियमांचा फज्जा अन् एकच गर्दी झाली
राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील सवांद दोऱ्यावर आले होते. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. हिंगोली शहरातील नांदेड नाका येथे कार्यकर्त्यानी चक्क पाटील यांचे स्वागत क्रेनच्या साह्याने करण्यासाठीसाठी क्रेनला हार बांधले. हिंगोलीत दाखल झालेले मंत्री पाटील यांनी हे भव्य स्वागत नाकारले. यामुळे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मेहणीतवर पाणी फिरल्याचे पहायला मिळाले. तसेच पाटील यांच्या दौऱ्या दरम्यान मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी गर्दी केली. यामध्ये बरेच कार्यकर्ते विना मास्क आढळून आले. त्यामुळे कोरोनाच्या नियमांची पायमली झाल्याचे दिसून आले.
बैठकीतही एकच गर्दी
या दौऱ्यात जयंत पाटीलांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासोबत संवाद बैठक घेतली. या बैठकी दरम्यानही मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे जबाबदार मंत्र्यांकडूनच अशा पद्धतीने कोरोना नियमांना हरताळ फासल्याचे पहायला मिळाले आहे.