महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मित्राच्या मदतीने प्रेयसीचा काढला काटा, खून करून मृतदेह फेकला नदीत - Hingoli Police News

सेनगाव येथील खुनाच्या घटनेत मित्राच्या मदतीने प्रेयसीचा खुन केला. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी पंजाबमधून अटक केली.

सेनगाव खुन प्रकरण

By

Published : Nov 12, 2019, 10:20 AM IST

Updated : Nov 12, 2019, 2:39 PM IST

हिंगोली - चित्रपटात एकामागून एक अशी रहस्य यावीत असाच काहीसा घटनाक्रम सेनगाव येथील खुनाच्या घटनेत आला आहे. चक्क आपल्या मित्राच्या मदतीने प्रेयसीचा एका रात्रीतच काटा काढला. युवतीनेही शेवटपर्यंत आपल्या प्रियकराचा घरच्यांना काहीच थांगपत्ता लागू दिला नाही. हि बनवाबनवी मात्र तरुणीच्या जीवावरच चांगलीच बेतली. प्रियकराच्या घरच्यांना चित्रपटात घडलेल्या घटनेचा प्रत्यय या खून प्रकरणात समोर आला. यात तरुणीच्या भावाच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. यात पोलिसांनी तपास करून प्रथम मित्राला तर मुख्य आरोपीला पंजाब येथून ताब्यात घेतले.

सेनगाव खुन प्रकरण

शारदा मांगीलाल बेलसरे (वय.२५ रा. धामणी, जि. अमरावती) अस मृत तरुणीचे नाव आहे. तर, नितीन अशोक बोबडे( वय.३०), रामदास लक्ष्मण इडोळे (वय.३५) (दोघेही रा. तामसी जि. वाशिम) अशी आरोपींची नावे आहेत. मुख्य आरोपी असलेल्या नितीन हा सैन्यदलात कार्यरत असून, नोकरीला लागण्यापूर्वी प्रथमच आरोपी नितीन अन शारदाची ओळख एका रेल्वे मध्ये झाली. याच ओळखीत त्यांनी एकमेकांना नंबर दिले. तेव्हापासून नेहमीच संपर्कात राहू लागले. याचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले. मग तासनतास हे दोघे फोनवर संपर्कात राहत असत. मग अधुन मधुन दोघे एकमेकांना भेटू लागले. शारदा ही स्पर्धा परीक्षेची तर आरोपी नितीन भरतीची तयारी करत होता. सुरुवातीपासून शारदाने आपल्याला आई वडील नाहीत असे सांगून बनवाबनवी करण्यास सुरुवात केली होती. फक्त एक भाऊ अन मी असल्याचे सांगून नितीनला चांगलेच भावनिक बनवले होते. तो ही शारदा म्हणेल तसे वागत गेला. मात्र, तो काही वर्षाने सैन्यदलात भरती झाला. प्रेमात स्वतःला वाहून घेतलेल्या या दोघांचे मात्र प्रेम तेच. सैन्यदलात दाखल झाल्याने त्यांच्या भेटीत खंड पडत गेला फोनवरील बोलणे मात्र सुरूच होते.

आरोपी नितीनने दुसऱ्या मुलीशी लग्न केले. अन शारदा सोबत फोन वर बोलत राहिला. लग्न झाल्यामुळे तो शारदाला टाळण्याचा खूप प्रयत्न करत होता. इतकेच काय तर त्याने फोनवरही बोलणे कमी केले होते. मात्र, शारदा सारखा सारखा फोन करत होती, अन लग्नाचा तगादा लावत होती. त्यामुळे तो तिला फोनवर बोलणे मोठ्या प्रमाणात टाळू लागला तस तसा शारदाचा संशय बळावत चालला होता. तिने माहिती काढली तर नितीनचे लग्न झाल्याचे समोर आले. तेव्हापासून मात्र या दोघांमध्ये खूप भांडण सुरू झाली. शारदाच्या रोज-रोज फोन करण्याने नितीन चांगलाच वैतागला होता. त्याने मनोमन ठरविले अन मित्राकडे जाऊत असे म्हणून तू तयार रहा मी निघालोय, असे सांगितले. इकडे शारदाने मी माझ्या दीपक पानसे नावाच्या मित्राकडे दिल्ली येथे जॉब करण्यासाठी जात असल्याचे सांगितले.

दुसरीकडून पूर्ण तयारीनिशी आल्याने नीतीने तामसी येथील आपल्या मित्राला गाडी तयार ठेव मला व माझ्या प्रेयसीला मित्राकडे जायचे आहे, असे सांगितले. त्यावरून सर्वजण मालेगाव येथे पोहोचले, अन गाडी मध्ये बसून जिंतूर मार्गे निघाले. गाडीत बसला असता, नितीन शारदाला संपण्याचाच विचार करत होता. अधून मधून मित्र गप्पा मारण्याचा प्रयत्न करत होता. तो दचकून मित्राला प्रतिउत्तर देत असे. मालेगाव येथून काही अंतरावर आल्यानंतर शारदा अन नितीन यांच्यात जोराचे भांडण झाले होते. भांडणा दरम्यान तुला खतम करतो असे नितीन वारंवार म्हणत होता. तर मित्र रामदास हा मित्राची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होता. सांगितल्या प्रमाणे रामदासने सेनगाव तालुक्यातील हत्ता नाईक तांडा परिसरात रस्त्याच्या कडेला पाणी पाहून गाडी थांबविली अन तो लघुशंकेसाठी उतरला तोच आरोपी नितीनने शारदा चा गळा आवळला. मृत्यू झाल्याची खात्री केली अन पाण्यांत दोघांच्या मदतीने मृतदेह फेकून दिला. अन दोघेही गायब झाले, तर नितीन कर्तव्यावर हजर झाला. इकडे पोलिसांना महिती मिळताच सेनगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून हा मृतदेह पाण्याबाहेर काढला व जिल्हा सामान्य रुग्णालयात शेवविच्छेदनासाठी हलवला. मृताची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी तिच्या घरच्या मोबाईकवरून सर्वाधिक जास्त वेळ संभाषण झालेल्या मित्राला सर्वप्रथम तामसी येथून ताब्यात घेतले.

पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला. त्याने सर्व प्रकार सांगितल्यानंतर पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैंजणे, पोनि जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुख्य आरोपीस पंजाब मधील जालंदर येथे गेले. मात्र, तो नवी दिल्ली येथे जात असल्याची माहिती मिळाली. पथकाने निजामोद्दीन रेल्वेस्थानकावरून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. या घटनेतून मात्र एक बाब सातत्याने समोर आलीय की, आरोपी हा कोणता ना कोणता पुरावा माघे सोडतच असतो. अखाद्य चित्रपटातील प्रेमकथे प्रमाणेच या प्रेमाचा ही शेवट झाला. दोघांना ही 14 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आले असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी वाय. बी. खान यांनी सांगितले.

Last Updated : Nov 12, 2019, 2:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details