हिंगोली-वसमत शहरापासून जवळच असलेल्या कॅनल रोडजवळ एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला. वसमत शहर पोलीस ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. मृतदेहाजवळ मोठ्याप्रमाणात रक्त साचल्यामुळे खुनाची शक्यता वर्तवली जात आहे.
हिंगोलीत आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह, खुनाची शक्यता - Hingoli crime news
हिंगोली शहराजवळच्या कॅनल रोडवर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला. या मृतदेहाची ओळख अद्यापही पटलेली नाही
हिंगोली शहरात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदहे
वसमत शहरापासून काही अंतरावर असलेल्या कॅनाल परिसरात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मृतदेहाजवळ डोक्याच्या बाजूला मोठयाप्रमाणात रक्त साचले अन जवळच गुटखा पुड्या, पैसे अन रेल्वेचे तिकीट ही आढळून आले. साधारणतः 40 ते 45 वयाची ही व्यक्ती असून, अजून तरी व्यक्तीची ओळख पटलेली नाही. घटनास्थळी पडलेले रक्त पुर्णतः गोठून गेले आहे. त्यामुळे ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.