हिंगोली- तालुक्यातील चांगेफळ शिवारातील हरिश्चंद्र सावकार यांच्या विहिरीमध्ये एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. व्यक्तीच्या गळ्यावर खुणा असून हा खून असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी अजून तरी कोणतीही नोंद झालेली नसली, तरीही मृताची ओळख पटवण्यासाठी पोलीस कसोशीने प्रयत्न करत आहेत.
मृत व्यक्तीच्या अंगावर जखमा असून त्यातून रक्तस्राव झालेला आहे. व्यक्तीजवळ कोणताही ओळखीचा पुरावा नाही. नरसी पोलीस ठाण्याच्या वतीने अंगावरील कपडे व हातात असलेल्या अंगठीचे वर्णन सोशल मीडियावरून व्हायरल करण्यात आले आहे.