महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वीजबिल वाढीच्या विरोधात हिंगोलीमध्ये भाजपचे आंदोलन - BJP demands reduction of electricity bill Hingoli

कोरोनामुळे नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीमध्ये नागरिकांना दिलासा देण्याचे सोडून, वीजबिलांमध्ये भरमसाठ वाढ करण्यात आली आहे. हे वीजबिल नागरिक कसे भरणार, असा सवाल उपस्थित करत आज भाजपच्या वतीने हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगावमध्ये आंदोलन करण्यात आले.

BJP demands reduction of electricity bill
भाजपकडून वीजबिलांची होळी

By

Published : Nov 23, 2020, 7:30 PM IST

हिंगोली -कोरोनामुळे नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीमध्ये नागरिकांना दिलासा देण्याचे सोडून, वीजबिलांमध्ये भरमसाठ वाढ करण्यात आली आहे. हे वीजबिल नागरिक कसे भरणार, असा सवाल उपस्थित करत आज भाजपच्यावतीने हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगावमध्ये आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपच्यावतीने वीजबिलांची होळी करण्यात आली.

कोरोनामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र सरकारने वीजबिलात भरमसाठ वाढ करून नागरिकांच्या अडचणी आणखी वाढवल्या आहेत. नागरिक वीजबिलाचे पैसे कसे भरणार, असा सवाल भाजपने उपस्थित केला आहे. वीजबिलामध्ये 50 टक्के सूट देण्यात यावी, तसेच उर्वरित बिल भरण्याासाठी हप्त्यांची सवलत मिळावी, या मागणीसाठी आज सेनगावमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. थकीत वीजबिल असलेल्या ग्राहकांची वीजजोडणी कट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तो रद्द करण्यात यावा अशी मागणी देखील आंदोलकांनी केली. यावेळी आंदोलकांनी वीजबिलांची होळी करत, सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details