हिंगोली - सध्या संपूर्ण जगभरात उत्तर प्रदेशतल्या हाथरस येथील बलात्कार प्रकारण चर्चिले चात आहे. पीडितेच्या नातेवाईकांना कुणाला ही भेटू दिले जात नाही. अशा परिस्थितीत काँग्रेस नेते राहूल गांधी व प्रियंका गांधी हे पीडितेच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी जात होते. पोलिसांनी अडवले अन् ते पडले, हे फक्त राजकारण आहे. मग त्यानी तर महाराष्ट्रात पण अनेक ठिकाणी बलात्कार झालेल्या ठिकाणी भेट पण द्याला हवे, असा खोचक सल्ला हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आलेले विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.
'राहुल गांधींनी केवळ उत्तरप्रदेशातच न जाता महाराष्ट्रात पण यायला पाहिजे' - hingoli praveen darekar latest news
कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतरही त्याला घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध झालेली नाही, वरून त्या मयतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी देखील कोरोना वार्डमधील कर्मचारी आलेले नाहीत. अजून दुर्दैव कोणते? तर सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचा मुख्य प्रश्न असेल तर तो पीक कर्ज आहे? अन् ते दिले जात नाही. त्यामुळे ज्या बँका पीक कर्ज देणार नाहीत, अशा बँकावर कारवाई व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे विरोधी पक्षनेते दरेकर यांनी सांगितले.
राहुल गांधींनी केवळ उत्तरप्रदेशातच न जाता महाराष्ट्रात पण यायला पाहिजे
सध्या सोयाबीनची कापणी जोरात सुरू आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांमध्ये सोयाबीनच्या नुकसानीचे पंचनामे होणे नितांत गरजेचे आहेत. तसे जिल्हाधिकारी यांच्या सोबत तसे बोलणेही झाले आहे. त्यामुळे निश्चितच दोन ते तीन दिवसांमध्ये पंचनामे होऊन येत्या आठ दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई मिळणे गरजेचे आहे. अन्यथा शेतकऱ्याला पैसे मिळवून देण्यासाठी आम्ही अजून टोकाचे पाऊल उचलणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.