हिंगोली- काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने देशभरातून संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत. हिंगोलीतही भाजपच्या वतीने राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. तर राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली.
भाजपचे राहुल गांधींविरोधात आंदोलन हेही वाचा - तोतया पोलिसांनी व्यापाऱ्याला घातला 2 लाखाचा गंडा
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे. ठिक-ठिकाणी राहुल गांधी यांच्याविरोधात आंदोलने सुरु आहेत. त्याच अनुषंगाने हिंगोली येथील गांधी चौक येथे भाजपच्या वतीने आंदोलन करत काँग्रेस विरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली.
हेही वाचा - नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात मुस्लिम समाज रस्त्यावर, हिंगोलीत मोर्चा
राहुल गांधी हे नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करत असल्याचा आरोपही भाजपच्या वतीने यावेळी करण्यात आला. हिंगोली येथे करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.