महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगोलीत पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; दिवसातील दुसरी तर आठवड्यातली तिसरी घटना

हिंगोली-वाशिम रस्त्यावर म्हसोबा टेकडीवर समोरून येणाऱ्या पिकअपची आणि दुचाकीची जोरात धडक झाली. यामध्ये दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा अतिस्त्रावामुळे जागीच मृत्यू झाला. तर, दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीला गंभीर मार लागला आहे.

By

Published : Jul 22, 2020, 7:47 PM IST

हिंगोलीत पिकपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
हिंगोलीत पिकपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

हिंगोली : जिल्ह्यातील कनेरगाव नाका येथून काही अंतरावर मसोबा नावाने प्रसिद्ध असलेल्या टेकडीवर हिंगोली-वाशिम रस्त्यावरुन येणाऱ्या पिकअप अन दुचाकीची समोरासमोर धकड झाली. ही धडक एवढी जबर होती की दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला तर, दुसरा व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. ही घटना दुपारी 3 वाजता घडली. एकाच दिवसातील अपघाताची ही दुसरी तरी आठवड्यातली तिसरी घटना आहे. ज्ञानेश्वर रमेश पडघन(30) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर मनोहर देवराव बोडखे (45) असे जमखीचे नाव आहे. हे दोघेही फाळेगाव ता. हिंगोली येथील रहिवासी आहेत.

पडघन आणि बोडखे हे (एमएच 38-9404) या दुचाकीने कनेरगावकडून कडेगावकडे येत होते. दरम्यान कनेरगावपासून काही अंतरावर असलेल्या म्हसोबा टेकडीवर समोरून येणाऱ्या पिकअपची (एमएच 38 एक्स 1260) आणि दुचाकीची जोरात धडक झाली. यामध्ये पडघन हे सिमेंट रस्त्यावर जोरात आदळले, त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. व डोक्यातून अतिरक्तस्त्राव झाल्याने पडघन यांचा जागीच मृत्यू झाला. तर, दुचाकीवरील मनोहर बोडके हे जखमी झाले असून पिकअपचा देखील टायर फुटला आहे.

दरम्यान, याच रस्त्यावर हिंगोलीपासून जवळच असलेल्या गारमाळ येथे ट्रकच्या धडकेत एका पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. ती घटना आठवणीतून जाते न जाते तोच ही घटना घडली. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मात्र, लॉकडाऊन नंतर वाहतुकीला परवानगी मिळाल्यानंतर अपघातांची मालिका सुरू झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच कनेरगाव पोलीस चौकीच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली घटनेचा पंचनामा सुरू केला आहे. या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details