हिंगोली-गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात अपघाताचे सत्र सुरूच आहे. आज पुन्हा औंढा-जिंतूर रोडवर झालेल्या कंटेनर दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील दोघे जण जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज (गुरूवारी) तीनच्या सुमारास घडली.
कंटेनर-दुचाकीचा अपघात; दोघांचा मृत्यू , एक गंभीर
जिल्ह्यात चोहोबाजूने रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यामुळे जिल्ह्यात अपघातांचे सत्र सुरूच आहे. आज औंढा ते जिंतूर मार्गे जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकी कंटेनरची समोरासमोर धडक झाली.
हेही वाचा-लोकशाही निर्देशांकाच्या क्रमवारीनुसार भारतात 'सदोष लोकशाही'
जिल्ह्यात चोहोबाजूने रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यामुळे जिल्ह्यात अपघातांचे सत्र सुरूच आहे. आज औंढा ते जिंतूर मार्गे जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकी कंटेनरची समोरासमोर धडक झाली. यामध्ये दुचाकीवरील तीन पैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक गंभीर जखमी आहे. ही धडक एवढी जोराची होती की, यामध्ये कंटेनर हा पूर्णता रस्त्याच्या कडेला जाऊन पडला. तर दुचाकीही रस्त्याच्या कडेला घासत गेली. यालीत दोघेजण रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. तर एक गंभीर जखमी अवस्थेत होता. प्रवाशांनी घटनास्थळी वाहने थांबवून जखमीला मदत करण्याचा प्रयत्न केला. रुग्णवाहिकेला संपर्क साधला. घटनेची माहिती मिळताच औंढानागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक वैजनाथ मुंढे यांनी पथकासह धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून, दोघांचेही मृत्यूदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. अपघातातील व्यक्तींची नावे अद्याप कळू शकले नाहीत.