हिंगोली - शालेय शिक्षण मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या शाळेत संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. या उपक्रमाची सुरुवात हिंगोली जिल्ह्यातून झाली असून आता प्रार्थनेच्या वेळी नियमितपणे संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन होणार आहे.
राज्य शासनाच्यावतीने 'सार्वभौमत्व संविधानाचे, जनहित सर्वांचे', हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
शालेय शिक्षण मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी त्या उपक्रमाची प्रत्यक्ष सुरुवातही हिंगोलीयेथीलहिंगोली जिल्हा परिषद कन्या प्रशाला येथून केली. या उपक्रमासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, नागरिक आणि अधिकारी उपस्थित होते. संविधानाची मूल्य बालमनावर रुजविण्यासाठी हा उपक्रम आता दररोज प्रार्थनेच्या वेळी राबविण्यात येणार असल्याचा निर्णय शासनाच्यावतीने घेण्यात आला आहे.