हिंगोली- गेल्या दहा दिवसापासून चर्चेत असलेल्या पूजा चव्हाण प्रकरणाने संपुर्ण महाराष्ट्र हा हादरून गेला आहे. पूजा या युवतीने नेमकी आत्महत्या का केली याचा अजूनही शोध लागलेला नाही. पोलीस प्रशासन या प्रकरणाचा कसून शोध घेत असताना, हिंगोली येथे बंजारा समाज एकवटला आहे. अशाताच आता मंत्री राठोडांच्या समर्थनार्थ शिवसेनादेखील रस्त्यावर उतरली आहे. मंत्री संजय राठोड यांच्यावर करण्यात येणारे आरोप हे चुकीचे आहेत, राठोड हे कधीच चूक करूच शकत नाहीत, असे म्हणत बंजारा समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
मंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ हिंगोलीत बंजारा समाजसह शिवसेनाही रस्त्यावर - पूजा चव्हाण आत्हत्या प्रकरण
आमच्या लाडक्या नेत्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय, या प्रकाराने संपूर्ण बंजारा समाजाच्या भावना दुखवल्या गेल्याची खंत मोर्चेकरांनी व्यक्त केली आहे. मोर्चामध्ये संपूर्ण जिल्ह्यातून बंजारा समाज हा ढोल-ताशांच्या गजरामध्ये हिंगोली येथील जिल्हा परिषद मैदानावर दाखल झाला. शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी या मोर्चाचे मार्गदर्शन केले, संजय राठोड यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यासंदर्भात सूचना दिल्या.
आमच्या नेत्याला बदनाम करण्यासाठी हा एक राजकीय स्टंट
बंजारा समाज हा शूरवीर समाज असून, आशा कधीच चुका या समाजकडून होत नाहीत, पूजा चव्हाण या युवतीने केलेल्या आत्महत्येचे खापर हे मंत्री संजय राठोड यांच्यावर फोडले जात आहे. हा एक राजकीय स्टंट असून, आमच्या लाडक्या नेत्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय, या प्रकाराने संपूर्ण बंजारा समाजाच्या भावना दुखवल्या गेल्याची खंत मोर्चेकरांनी व्यक्त केली आहे. मोर्चामध्ये संपूर्ण जिल्ह्यातून बंजारा समाज हा ढोल-ताशांच्या गजरामध्ये हिंगोली येथील जिल्हा परिषद मैदानावर दाखल झाला. शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी या मोर्चाचे मार्गदर्शन केले, संजय राठोड यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यासंदर्भात सूचना दिल्या.
जिल्हा परिषद मैदानावरून निघाला मोर्चा
जिल्ह्यातील बंजारा समाज हा हिंगोली शहरातील जिल्हा परिषद मैदानावर ढोल ताशाच्या गजरात मध्ये दाखल झाला होता. त्या ठिकाणी मान्यवरांनी संजय राठोड यांच्या समर्थनार्थ भाषण केल्यानंतर मोर्चा शहरातील मुख्य मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाला. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने बंजारा समाज व शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्यासह शिवसेना कार्यकर्ते सहभागी झाले होते, तर पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे.
पूजा चव्हाण प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न-
मंत्री संजय राठोड हे बंजारा समाजातील तळागाळाचा विचार करणारे मंत्री आहेत. एवढेच नव्हे तर आम्हा सर्व बंजारा समाजाचा त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास आहे, ते असे घाणेरडे काम कधीच करू शकत नाहीत, राठोड यांना पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणांमध्ये उगीचच गोवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप बंजारा समाजाच्या वतीने केला जात आहे.