हिंगोली - नरेंद्र मोदी यांनी देशाला लुटले आहे. जनता त्यांनी दिलेल्या आश्वासनावर होती. मात्र, त्यांनी कोणतेही आश्वासन पूर्ण केले नाही. त्यांच्यासारखा खोटारडा माणूस जगात शोधुनही सापडणार नाही, अशी टीका अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मोहन राठोड यांच्या प्रचारार्थ हिंगोलीत सभा घेण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
मोदींसारखा खोटारडा माणूस या जगातही सापडणार नाही - प्रकाश आंबेडकर - election
आज हिंगोली जिल्ह्यातील कनेरगाव नाका येथे बाळासाहेब आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडी एम. आय. एम.चे हिंगोली लोकसभेचे अधिकृत उमेदवार मोहन राठोड यांच्या प्रचारार्थ आले होते.
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या हिंगोली लोकसभा मतदारसंघात सध्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आपापल्या पक्षाचे पदाधिकारी प्रचारार्थ हिंगोलीत दाखल होत आहेत. आज हिंगोली जिल्ह्यातील कनेरगाव नाका येथे बाळासाहेब आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडी एम. आय. एम.चे हिंगोली लोकसभेचे अधिकृत उमेदवार मोहन राठोड यांच्या प्रचारार्थ आले होते.
सभेला वंचित बहुजन आघाडी व एमआयएमच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने गर्दी झाली होती. आंबेडकर यांनी मोदी सरकारवर विविध उदाहरणे देत सडकून टीका केली. एवढेच नव्हे तर राफेलचा मोठ्या प्रमाणात घोटाळा केलेले हे सरकार आहे. आमच्याकडे कोणतेच कागद नसल्याचेही हे सरकार सांगत आहे. त्यामुळे चोरी केलेली लपवायची कशी? हे या सरकारकडून शिकण्यासारखे आहे, असा टोला आंबेडकर यांनी लगावला.
आज या देशांमध्ये भयंकर महागाई वाढलेली आहे. हे सरकार पुन्हा आले तर, या देशाचा काही खरे नाही. कधी काय निर्णय घेईल याचा ताळमेळ नाही. त्यामुळे तुमचे मत वाया जाणार नाही, याची काळजी घ्या, असा सल्ला बाळासाहेब आंबेडकर यांनी यावेळी मतदारांना दिला.