महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Attempted Self Immolation : प्रजासत्ताक दिन सोहळ्याला गालबोट, राज्यात तीन ठिकाणी आत्मदहनाचे प्रयत्न - प्रजासत्ताक दिन सोहळ्याला गालबोट

प्रजासत्ताक दिन सोहळ्याला राज्यात तीन ठिकाणी गालबोट लागले आहे. प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा करताना बीड, हिंगोली, सातारा या ठिकाणी विविध मागण्यासाठी आत्मदहनाचा प्रयत्न ( Attempted Self Immolation ) झाला. यात हिंगोली येथील तरुण गंभीर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Attempted Self Immolation
राज्यात तीन ठिकाणी आत्मदहनाचे प्रयत्न

By

Published : Jan 26, 2022, 2:26 PM IST

मुंबई - प्रजासत्ताक दिन सोहळ्याला राज्यात तीन ठिकाणी गालबोट लागले आहे. प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा करताना बीड, हिंगोली, सातारा या ठिकाणी विविध मागण्यासाठी आत्मदहनाचा प्रयत्न ( Attempted Self Immolation ) झाला. यात हिंगोली येथील तरुण गंभीर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

  • मानवाधिकार संघटनेच्या कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न -

हिंगोलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर डिझेल ओतून आत्महदनाचा प्रयत्नहिंगोली- येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका भारतीय मानवाधिकार संघटनेच्या कार्यकर्त्याने अंगावर डिझेल ओतून प्रजासत्ताक दिनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टाळण्यासाठी मदत झाली आहे. मिलिंद प्रधान असे या कार्यकर्त्याचे नाव आहे. त्याने कायद्याचा दुरुपयोग करून शासकीय महसूल बुडवला तसेच तुकडे बंदी कायद्याचा भंग केल्याप्रकरणी सेनगाव येथील अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्याची मागणी केलेली आहे. मात्र त्या मागणीकडे अजून लक्ष न दिल्याने प्रधान याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे.

  • साताऱ्यात ज्योती नलावडेने केला आत्मदहनाचा प्रयत्न -

सातारा - जावली बँकेत घोटाळा झाल्याचा आरोप करत ज्योती नलावडे या महिलेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. ज्योती नलावडे या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

  • कोरोना काळात पुरवले बेड, बील न मिळाल्याने तरुणाने केला आत्मदहनाचा प्रयत्न -

बीड - ध्वजारोहणानंतर धारुर येथील तहसील कार्यालयात तरुणाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. पवन तट असे त्या तरुणाचे नाव आहे. पवन याचा मंडप डेकोरेशनचा व्यवसाय आहे. कोरोना काळात रुग्णांना बेड, बेडशीट पुरवले होते. मात्र बील न मिळाल्यामुळे त्याने आत्मदहनाचा इशारा दिला होता.

हेही वाचा -Tableau of Maharashtra on Rajpath : राजपथावर चित्ररथातून महाराष्ट्रातील जैवविविधतेचे दर्शन; रथ दिसताच गडकरींचे स्मितहास्य, पाहा VIDEO

ABOUT THE AUTHOR

...view details