महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

योजनांच्या नावाखाली काँग्रेसने केवळ स्वतःचेच पोट भरले - योगी आदित्यनाथ - yogi adityanath rally in hingoli

या मोदी-देवेंद्र फडवणीस सरकारच्या नेतृत्वात सर्व सुरक्षित आहेत. नाहीतर, दहशतवाद व नक्षली हल्ले वाढले असते. विकास करण्यासाठी अन दहशतवाद, भ्रष्टाचार रोखण्यासह राष्ट्रवाद जपण्यासाठी भाजप सरकार पुन्हा एकदा सत्तेत आणणे गरजेचे असल्याचे योगी आदित्यनाथ म्हणाले.

योगी आदित्यनाथ

By

Published : Oct 14, 2019, 1:12 PM IST

हिंगोली -'काँग्रेस सरकार पंधरा वर्षे सत्तेत राहिली असली तरीही त्यांनी जनतेची तर कामे केलीच नाहीत शिवाय विकासाच्या नावाने ही बोंबाबोंब. उलट योजनांच्या नावाखाली स्वतःचीच पोटे भरली,' अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. ते महायुतीचे उमेदवार तानाजी मुटकुळे यांच्या प्रचारासाठी हिंगोलीत आले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 370 कलम हटवून एक संघ राष्ट्र निर्माण केले आहे वास्तविक पाहता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा देखील या 370कलम ला विरोध होता मात्र काँग्रेसच्या काळात ते कलम रद्द होऊ शकलं नाही. परंतु या महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये ते 370 कलम गृहमंत्र्यांनी रद्द केले.

या मोदी-देवेंद्र फडवणीस सरकारच्या नेतृत्वात सर्व सुरक्षित आहेत. नाहीतर, दहशतवाद व नक्षली हल्ले वाढले असते. विकास करण्यासाठी अन दहशतवाद, भ्रष्टाचार रोखण्यासह राष्ट्रवाद जपण्यासाठी भाजप सरकार पुन्हा एकदा सत्तेत आणणे गरजेचे असल्याचे योगी आदित्यनाथ म्हणाले.

हेही वाचा - मोदींनी ५ वर्षांत जे देशाचे नुकसान केले, ते काँग्रेसने कधीच केले नाही - राहुल गांधी

महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार होते. मात्र या सरकारच्या काळात सर्वसामान्यापर्यंत योजना तर पोहोचल्याच नाहीत अनेक कुटुंबे योजनांपासून वंचितच आहेत. मात्र, या महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये योजना ह्या प्रत्येकापर्यंत कशा पोहोचतील याचाच वारंवार प्रयत्न केला जात आहे. काँग्रेसने केवळ योजनांच्या नावाने स्वतःचीच पोटे भरून सर्वसामान्यांना वाऱ्यावर सोडले. मात्र आमच्या सरकारच्या काळात आयुष्यमान भारत स्टार्ट अप इंडिया, उज्वल योजना सौभाग्य योजना, प्रधानमंत्री आवास योजना यांच्या माध्यमातून योजना सर्वसामान्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. तसेच वर्षानुवर्ष असलेले मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठीही प्रयत्न केले आहेत. एवढी विकासात्मक कामे भाजप करीत असेल तर मतदान मागण्याचा अधिकार आम्हाला नक्कीच आहे,' अशी साद घालत या विधानसभा निवडणुकीत महायुतीला सहकार्य करण्याचे आवाहन केले.

दरम्यान, राष्ट्रवादीचे रामराम वडकूते हे 15 ऑक्टोबरला प्रवेश करणार असल्याची चर्चा पुन्हा जोरदार रंगत आहे. विद्यमान आमदार तान्हाजी मुटकुळे, बाबाराव बांगर, दिवाकर माने उपस्थित होते.

हेही वाचा - चंद्रकांत पाटलांच्यात दम होता, तर 'तेथे' का हिसका दाखवला नाही - अण्णासाहेब डांगे

ABOUT THE AUTHOR

...view details