हिंगोली- जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सायंकाळी आरोग्य विभागास प्राप्त झालेल्या अहवालात आणखीन एका जवानाचा अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 46 वर पोहोचली असून, आतापर्यंत एकट्या 42 जवानांना लागण झालेली आहे. त्यामुळे यांच्या संपर्कात आलेल्या जवानांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हिंगोलीत आणखी एका जवानाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या 46 - जवानाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या 46
हिंगोली जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 46 वर पोहोचली आहे. एकूण 42 जवान कोरोनाबाधित झाले आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत 46 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. हिंगोली येथील राज्य राखीव दलातील जवान हॉट स्पॉट आलेल्या मालेगाव अन मुंबई येथे बंदोबस्त करून परतले होते. खबरदारी म्हणून त्याना समादेशक मंचक ईप्पर यांनी क्वॉरंटाईन केले होते. त्यातील सर्वांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले असता, एक - एकाचे अहवाल हे पॉझिटिव्ह येणे सुरू झाले. सुरुवातीला 6 नंतर 4 अन आता एकदम 25 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर त्याच सायंकाळी पुन्हा एका जवानाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
सध्या हिंगोली जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही 46 वर पोहोचली आहे. एकूण 42 जवान कोरोनाबाधित झाले आहेत. अजूनही अहवाल येणे बाकी आहे. त्यामुळे हिंगोलीकरांची खरोखरच धाकधूक वाढत चालली आहे. आजपावेतो हिंगोली जिल्ह्यात एकूण 47 कोरोना बाधित रुग्ण झालेले आहेत. यातील एक कोरोनाबाधित रुग्ण बरा होऊन गेला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत 46 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत.