बकरा चिन्हामुळे भगवान कुंथुनाथ यांच्या मूर्तीची पटली ओळख हिंगोली :औंढा नागनाथ येथील जैन मंदिरात जीर्णद्वाराचे काम सुरू आहे. यासाठी जैन मंदिर परिसरात खोदकाम सुरू करण्यात आले आहे. मंदिराचा पाया खोदताना पायामध्ये एक मोठा दगड लागला हा दगड हळुवार पणे काढण्याचा प्रयत्न केला तर मूर्ती असल्याचे दिसून आले. मूर्ती पूर्णपणे बाहेर काढली असता मूर्तीवर बकरा हे चिन्ह दिसून आल्याने भगवान कुंथुनाथ भगवंतांचे अंकित असल्याने ही मूर्ती भगवान कुंथुनाथची असल्याचे तेजकुमार झांझरी यांनी सांगितले.
औंढा नागनाथ आठवे ज्योतिर्लिंग : आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथील विविध भागांमध्ये पुरातन मंदिरे आहेत. जैन धर्माचे देखील या ठिकाणी अतिशय पुरातन मंदिर असून या मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम हाती घेतले आहे. 23 जानेवारी रोजी या मंदिराचे भूमिपूजन झाले आहे. प्रत्यक्षात 26 जानेवारी रोजी खोद कामाला सुरुवात करण्यात आली. 31 जानेवारी रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास मजुऱ्यांनी मंदिराच्या पायाचे खोदकाम सुरू केले. तेव्हा मजुरांना अचानक एक मोठा दगड जाणवला. भगवंताची मूर्ती बाहेर काढताच परिसरामध्ये एकच गर्दी झाली.
बकरा चिन्हामुळे पटली भगवंतांची ओळख :भगवंताच्या मूर्तीवर बकरा हे चिन्ह आढळून आल्याने ही मूर्ती भगवान गुंतूनाथची असल्याचे तेजकुमार झांजरी यांनी सांगितले. जवळपास सव्वा पाच फुटाची ही मूर्ती आहे.एकूण 24 तीर्थकारांपैकी सतरावे तीर्थकार असलेले भगवान कुंतूनाथचीच असल्याचे स्पष्ट झाले. एवढेच नव्हे तर याच मूर्तीच्या बाजूला दोन फुटाची पार्श्वनाथ भगवान यांची ही मूर्ती सापडली. मूर्तीची स्थापना ही जैन गुरूंच्या मार्गदर्शनानुसार केली जाणार आहे. नागनाथ येथील मंदिर प्रसारामध्ये 1972 मध्ये पडलेल्या दुष्काळा दरम्यान तलावाचे खोदकाम करत असताना भगवान विष्णू यांची मूर्ती आढळली होती. या मूर्तीची स्थापना नागनाथ मंदिरामध्ये करण्यात आली आहे. आता या मंदिरामध्ये देखील ही मूर्ती सापडल्यामुळे या परिसरामध्ये अजूनही अनेक मुर्त्या असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मंदिरामध्येच केली जाणार स्थापना : भगवान कुंथुनाथची स्थापना आता नव्यानेच उभारण्यात येणाऱ्या मंदिरामध्ये केली जाणार आहे. तरी देखील जैन गुरूंकडून या संदर्भात मार्गदर्शन घेतले जाणार आहे. अजून ही या भागामध्ये खोदकाम करताना भगवंताच्या मूर्त्या मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही जैन समाजातील अनेक जण या खोद कामावर लक्ष ठेऊन असल्याचे तेजकुमार झाझरी यांनी सांगितले.
हेही वाचा :Mumbai Crime: 18 दिवसांनी मृत्यूशी झुंज संपली, ॲसिड हल्ल्यातील जखमी महिलेचा मृत्यू