हिंगोली : सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्याची प्रथा सगळी कडे मोठ्या प्रमाणावर पहायला मिळत आहे. शहरी भागात अलीशान सोसायट्या मोठमोठी हाॅटेल्स, तसेच खासगी फार्म हाऊस अशा विविध ठिकाणी मित्र मंडळींसोबत थर्टी फस्ट मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. या निमित्ताने हाॅटेल्स आणि अनेक विध संस्था वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करतात, त्यासाठी वेगवेगदळ्या अॅाफर्सही दिल्या जातात त्याची जाहिर जाहिरातबाजीही केली जाते. हा प्रकार आता ग्रामीण भागातही पहायला मिळत आहे. पार्टीच्या उत्साहात नियमांचे उल्लंघन होउ नये यासाठी पोलीस प्रशासन पण सज्ज झाले आहे. पार्टी करणाऱ्यांनी सावधानता बाळगली नाही तर पोलीस अॅक्शन मोडवर आहेत
सरत्या वर्षाला निरोप देताना उती उत्साही तरूणांकडून नियमांचा भंग होऊ नये यासाठी पोलीसांनी जिल्ह्यातील विविध भागांत वेगवेगळे पथके तयार करुन ते तैनात केले आहेत. त्यामुळे आपल्याकडून कोणतेही चुकीचे कृत्य घडू नये व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे होऊ नये याची काळजी मध्यप्रेमींनाच घ्यावी लागणार आहे. तसे न झाल्यास कारवाई होउ शकते त्यामुळे आधीच काळजी घेण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने केरण्यात आले आहे.