हिंगोली- वेगवेगळी संकटे यावर्षी शेतकर्यांचा काही केल्या पिच्छा सोडत नाहीयेत. अगोदरच कोरोनामुळे हवालदिल झालेला शेतकरी पर्जन्यमानाने हादरून गेला आहे. खरिपाची पिके अति पावसातून वाचलीत. मात्र, आता त्यावर किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे सोयाबीन पिकावर चक्रीभुंगा किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची काळजी योग्य पध्दतीने घेत वेळीच यावर नियंत्रण मिळवून नुकसान टाळण्याचे आवाहन कृषी विभाच्या वतीने तालुका कृषी अधिकारी संतोष बेनटेवाड यांनी केले आहे.
शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. सतत पाऊस सुरू असल्यामुळे शेती पिकांचे तर अतोनात नुकसान होतच आहे. शिवाय नदीनाले ओढ्यालगत असलेल्या शेतजमिनीतील खरीपाची पिके ही खरडून जात असल्याचेही चित्र जिल्ह्यात पाहायला मिळाले आहे. या संकटातून वाचलेल्या खरिपाच्या पिकांवर किडीचा प्रार्दुभाव वाढला आहे. शेतकऱ्यावंर आलेले हे मोठे संकट आहे. या संकटामुळे सोयाबीनचे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता असल्याने, कृषी विभाग शेतकऱ्यांना जागृत करण्याचा प्रयत्न करत आहे.
चक्रीभुंगा असा करतोय सोयाबीनच्या देठाचे नुकसान